Rajasthan Political Crisis: ना भाजपा, ना काँग्रेस सचिन पायलट यांचा वेगळाच उद्देश; नवं आव्हान आणि नवी आघाडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 11:38 AM2020-07-13T11:38:41+5:302020-07-13T12:32:16+5:30

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. याचदरम्यान पायलट भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

Rajasthan Political Crisis: Neither BJP nor Congress Sachin Pilot will form Third Front | Rajasthan Political Crisis: ना भाजपा, ना काँग्रेस सचिन पायलट यांचा वेगळाच उद्देश; नवं आव्हान आणि नवी आघाडी?

Rajasthan Political Crisis: ना भाजपा, ना काँग्रेस सचिन पायलट यांचा वेगळाच उद्देश; नवं आव्हान आणि नवी आघाडी?

Next
ठळक मुद्देसचिन पायलट यांची तिसरी आघाडी बनवण्यामागे अनेक महत्त्वाच्या बाजू समोर येत आहेतसचिन पायलट यांना ३५-४० आमदारांचे समर्थन लागेल जे आव्हानात्मक असणार आहे.सचिन पायलट तिसरी गट स्थापन करुन काँग्रेसला आव्हान देण्याच्या तयारीत

जयपूर – राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट(Sachin Pilot) यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने अशोक गहलोत सरकार अडचणीत आलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तणाव वाढल्याने राजस्थानमधीलकाँग्रेस सरकारवर संकट आलं आहे.

सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. याचदरम्यान पायलट भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सचिन पायलट तिसरी आघाडी बनवू शकतात असंही सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन पायलट यांच्या नवीन पक्षाचं नाव प्रगतिशील मोर्चा अथवा प्रगतिशील काँग्रेस असू शकतं. (Congress)

सचिन पायलट यांची तिसरी आघाडी बनवण्यामागे अनेक महत्त्वाच्या बाजू समोर येत आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सचिन पायलट यांचे समर्थन करणाऱ्या आमदारांची संख्या इतकी जास्त नाही जेणेकरुन काँग्रेस सरकार पडेल. अशोक गहलोत वारंवार काँग्रेस आमदार आणि पार्टीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसने आमदारांना व्हिप जारी केला आहे. ज्यात पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना सहभागी व्हावं लागेल. जे या बैठकीला हजर राहणार नाहीत अशांविरोधात कारवाई केली जाऊ शकते. अशा परिस्थिती सचिन पायलट तिसऱ्या आघाडीचा पर्याय स्वीकारु शकतात. (Rajasthan Political Crisis)

दरम्यान, सचिन पायलट यांना काँग्रेसच्या ३० आमदारांचे समर्थन मिळाले, जर त्यांना या आमदारांची साथ मिळाली आणि त्यांनी तिसरी आघाडी बनवली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारचं नुकसान होऊ शकतं. पण तिसरा गट बनवण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या एक तितृयांश आमदारांचे पाठबळ लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट यांना ३५-४० आमदारांचे समर्थन लागेल जे आव्हानात्मक असणार आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Video: ‘अच्छा चलता हूँ दुवाओं मै याद रखना’; मृत्यूपूर्वी हॉस्पिटलमध्ये युवकानं गायलं गाणं, नेटिझन्स भावूक

पाक आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत पाठांतर करा, शाळेचा विद्यार्थ्यांना होमवर्क; पालक संतापले

चीन आणि इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर्सचा करार होणार; अमेरिकेसह भारताचंही टेन्शन वाढणार

ते' स्टेटमेंट मी मुद्दामच केलं, भाजपा-सेनेचं सरकार बनू नये म्हणून...; अखेर शरद पवारांनी 'सिक्रेट' सांगितलं!

ती आमची राजकीय चाल होती; देवेंद्र फडणवीसांच्या 'गौप्यस्फोटा'वर शरद पवारांचा 'स्फोट'

 

Web Title: Rajasthan Political Crisis: Neither BJP nor Congress Sachin Pilot will form Third Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.