नवी दिल्लीः राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान काँग्रेस पक्षाने भाजपावर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दोन व्हायरल ऑडिओ क्लिपचा हवाला देत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत राजस्थान सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचं सुरजेवाला म्हणाले आहेत. अशा वेळी त्यांच्याविरोधात त्वरित एफआयआर दाखल झाले पाहिजे आणि अटक करण्यात यावी, अशी मागणीही सुरजेवालांनी केली आहे. याबाबत SOGकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचवेळी कॉंग्रेसने दोन आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे.या संपूर्ण कटात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचा हात असल्याचा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. त्यांच्यावर त्वरित एफआयआर दाखल करावा आणि अटक करण्यात यावी. या संपूर्ण प्रक्रियेत केंद्र सरकारचे कोणते लोक सामील आहेत, याचा तपासात खुलासा झाला पाहिजे.कॉंग्रेस प्रवक्ते म्हणाले की, सचिन पायलट यांनी पुढे येऊन हे सत्य प्रकट करावे आणि आमदारांची यादी जाहीर करावी. ऑडिओमध्ये बोलणार्या भंवरलाल शर्मा, विश्वेन्द्र सिंग यांना कॉंग्रेसकडून निलंबित करण्यात आले असून, नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात SOGकडे तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, आज राजस्थान सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, काही ऑडिओ क्लिपही समोर येत आहेत. ज्यामध्ये राजस्थानातील कॉंग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला यांनी कॉंग्रेस नेते भंवरलाल शर्मा आणि भाजपा नेते संजय जैन यांच्यातील संभाषणाविषयी सांगितले.
हेही वाचा
खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा
CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क
कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना
बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी
धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा
देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट