शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

Rajasthan Political Crisis : सचिन पायलट यांचा बंडाचा झेंडा, गेहलोत सरकार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 4:52 AM

राज्यात कोरोनाचे संकट असताना माणुसकीची जराही चाड न ठेवता भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आमदारांचा घोडाबाजार भरवून आपले सरकार पाडण्याच्या खटपटी करत आहे, असा उघड आरोप गेहलोत यांनी केला आहे.

जयपूर : काँग्रेसचे नेते व राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारल्याचे स्पष्ट झाले असून, ते आता भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी रविवारी दिल्लीत अहमद पटेल यांची भेट घेतली खरी, पण त्यानंतर ते अलीकडेच भाजपमध्ये सहभागी झालेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांचीही भेट घेतली. त्यामुळे ते 30 आमदारांसह भाजपमध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे.तसे झाल्यास मध्य प्रदेशनंतर राजस्थानहीकाँग्रेसच्या हातातून जाईल आणि तिथे भाजप सत्तेवर येऊ शकेल. दिवसभराच्या राजकीय घटनांनंतर अशोक गेहलोत यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक रात्री बोलावली. पण आपण त्या बैठकीला जाणार नाही, असे जाहीर करून पायलट यांनी मुखमंत्र्यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले. पुरेसे आमदार, भाजपची छुपी साथ आणि मुख्यमंत्री बनवण्याचे भाजपने दिलेले आश्वासन यामुळेच ते अशोक गेहलोत यांना आव्हान देत आहेत, असे सांगण्यात येत आहे. आपण दिल्लीत सोनिया गांधी वा राहुल गांधी यांना भेटलो नाही, असेही रात्री पायलट यांनी स्पष्ट केले.याआधी राज्य पोलिसांच्या विशेष कारवाई शाखेने याच संदर्भात भारतीय दंडविधानाच्या कलम १२० बी( गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे) व कलम १२४ ए (देशद्रोह) या कलमान्वये गुन्हा नोंदवून उदयपूरमधून अशोक सिंग व बीवर येथून भारता मालानी या दोघांना अटक केली होती. त्याच प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी स्वत: मुख्यमंत्री गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिनपायलट यांनाही नोटिसा पाठविल्या आहेत.राज्यात कोरोनाचे संकट असताना माणुसकीची जराही चाड न ठेवता भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आमदारांचा घोडाबाजार भरवून आपले सरकार पाडण्याच्या खटपटी करत आहे, असा उघड आरोप गेहलोत यांनी केला आहे. भाजपाने मात्र, सरकार पडलेच तर ते काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ््यांनी पडेल. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही, असे सांगून हात झटकले आहेत.कर्नाटक व मध्य प्रदेशमध्ये आमदारांची फोडाफोडी करून तेथील काँग्रेसची सरकारे पाडल्यानंतर भाजपा तसाच प्रयत्न राजस्थानमध्ये करेल, अशी अपेक्षा होतीच. गेल्या १० जून रोजी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी तशी कुणकुणही लागली होती. म्हणूनच त्यावेळी काँग्रेसने सर्व समर्थक आमदारांना रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवले होते. आता पुन्हा तेच प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन संभाव्य फुटिरांना थोपविण्यासाठी सरकारने हा कायदेशीर डाव टाकल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते. काँग्रेसचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी दाखल केलेल्या फियार्दींवरून पोलीस व एसीबी या दोन्ही आघाड्यांवर संभाव्य बंडखोरांच्या मागे हा ससेमिरा लावण्यात आल्याचे दिसते.

सिंदिया यांचा महत्त्वाचा वाटासचिन पायलट यांच्यासोबत काँग्रेसचे २७ व तीन अपक्ष आमदार असून, ते सर्व भाजप नेत्यांच्या संपर्कात असून, सिंदिया यांचा राजस्थानात अस्थिरता आणण्यात महत्त्वाचा वाटा आहे.कारण सिंदिया वगळता भाजपच्या एकही नेत्याला पायलट भेटलेले नाहीत. मात्र काँग्रेसमध्ये जे सुरू आहे, त्याच्याशी आमचे काही देणे घेणे नाही, आम्ही सरकार पाडण्याचे प्रयत्न करणार नाही, ते आपोआप कोसळेल, असे भाजप नेते सांगत आहेत.आपल्या एके काळच्या सहकाऱ्यांवर काँग्रेसमध्ये अन्याय होत आहे, त्याला बाजूला केले जात आहे, अशी ज्योतिरादित्य सिंदिया यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे.काँग्रेस बंड मोडून काढणारकाँग्रेस व गेहलोत यांनीही पायलट यांच्या बंड मोडून काढायचे आणि पायलट यांना एकटे पाडायचे, ठरविले असावे, असे दिसते. त्यामुळेच राजस्थानात गेहलोत हेच मुख्यमंत्री राहतील, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजप करीत असून प्रत्येक आमदाराला १५ कोटी रुपयांची लालूच दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारीच केला होता.त्यानंतर भाजपच्या दोन कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच गेहलोत आणि पायलट यांना त्यांचे म्हणणे नोंदविण्यास पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पायलट अधिकच संतापले आहेत.तीन अपक्ष आमदारांवर नोंदवले गुन्हे- अपक्ष आमदार फोडून राजस्थानमधील काँग्रेसचे अशोक गेहलोत सरकार पाडण्याच्या कथित ‘कारस्थाना’वरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याच संदर्भात सरकारला पाठिंबा देणाºया तीन अपक्ष आमदारांविरुद्ध गुन्हे नोंदविले.- ओम प्रकाश हुडला, सुरेश टांक व खुशवीर सिंग या तीन अपक्ष आमदारांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे, यास ह्यएसीबीह्णचे महासंचालक डॉ. आलोक त्रिपाठी यांनी दुजोरा दिला. हा गुन्हा नोंदविला जाताच काँग्रेसने या तिघांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सहयोगी सदस्यत्वही रद्द केले.- सरकार पाडण्यासाठी बांसवाडा आणि डुंगरपूरमधील अपक्ष आमदारांसह इतरही काही आमदारांना कोट्यवधी रुपयांची लांच देऊ केल्याच्या आरोपांवरून हे गुन्हे नोंदविण्यात आल्याचे समजते. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार लाच देणे हाही गुन्हा आहे.आमदारांकडून पत्रे घेणार : काहीही झाले तरी साथ सोडणार नाही, अशी हमी देणारी पत्रे काँग्रेस त्यांच्या सर्व आमदारांकडून घेणार असल्याचे कळते. याची जबाबदारी सर्व मंत्र्यांवर सोपविण्यात येणार असून मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्यासाठी मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.सचिन पायलट दिल्लीतसचिन पायलट यांनी त्यांच्या गटातील १२ आमदारांसह दिल्लीत तळ ठोकला असल्याचेही वृत्त आहे. पायलट यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली असून गेहलोत यांच्याकडून पक्षपाती वागणूक मिळत असल्याची तक्रार ते पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे कळते. पायलट यांचे शनिवारी रात्री पक्षाचे खजिनदार अहमद पटेल यांच्याशी फोनवर बोलणे झाले. पण तेव्हापासून कोणाचाही फोन उचलत नसल्याने ते नेमके कुठे आहेत, हे समजत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलट