Rajasthan Politics: काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात मोठा बदल झाला. मल्लिकार्जुन खर्गे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. पण, यानंतरही पक्षातील अंतर्गत कलह थांबायचे नाव घेत नाहीये. राजस्थानमध्ये (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यात पुन्हा एकदा खटके उडण्यास सुरुवात झाली आहे.
नेमकं काय झालं?नुकतच अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथे मानगढ गौरव गाथा कार्यक्रमात उपस्थित राहून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. त्याचवेळी पीएम मोदींनीही अशोक गेहलोत यांचे कौतुक केले होते. यावरुन आता सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी सीएम गेहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले पायलट?
गहलोत यांच्यावरही बोचरी टीका पायलट यांनी यावेळी गहलोत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'सीएलपीची बैठक 25 सप्टेंबर रोजी राजस्थानमध्ये होणार होती, परंतु ती होऊ शकली नाही. यासाठी सीएम गेहलोत यांनी पक्षनेतृत्वाची माफीही मागितली आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. काँग्रेस पक्ष हा शिस्त आवडणारा पक्ष आहे, असा संदेश जावा यासाठी कारवाई केली जाईल. नियम आणि कायदे सर्वांसाठी समान आहेत. नोटीस मिळालेल्या तीन नेत्यांनीही आपले उत्तर दिले आहे. आता यावरही बोलून निर्णय होईल. चूक झाली असेल तर ती सुधारण्याची वेळ आहे,' असे पायलट म्हणाले.