Rajasthan Politics: राजस्थान काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वी वादळ; सचिन पायलट वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 03:01 PM2023-05-09T15:01:05+5:302023-05-09T15:02:58+5:30

पक्षनिष्ठेच्या मुद्द्यावरून पायलट यांचा अशोक गेहलोत यांना इशारा

Rajasthan politics Sachin Pilot gives warning to CM Ashok Gehlot people will decide future | Rajasthan Politics: राजस्थान काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वी वादळ; सचिन पायलट वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत?

Rajasthan Politics: राजस्थान काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वी वादळ; सचिन पायलट वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत?

googlenewsNext

Rajasthan Politics, Sachin Pilot vs Ashok Gehlot: राजस्थानमध्ये निवडणुकीपूर्वी उठलेल्या राजकीय वादळात अशोक गेहलोत आणि सचिन पायलट आता उघडपणे एकमेकांच्या विरोधात आले आहेत. अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्या 2020 च्या बंडखोरीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, आता पायलट यांनी आज त्यांना उत्तर दिले. गेहलोत हे वसुंधरा राजे यांना आपल्या नेत्या मानतात. माझ्यावर टीका करण्यात वेळ घालवू नये. जनता माझ्या भवितव्याबद्दल ठरवेल, असे ते म्हणाले. गेहलोत यांच्या विरोधात ते आपली धारदार वाणी कायम ठेवणार असल्याचे पायलट यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. त्याचबरोबर भ्रष्टाचारावर उपोषण केल्यानंतर पायलट यांनी आता तरुणांसाठी जनसंघर्ष पदयात्रेची घोषणा केली आहे. त्यामुळे पायलट आपल्या सरकारविरोधात जात, वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून पैसे घेतल्याच्या आरोपांवर पायलट म्हणाले की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर पैशासाठी विकल्याचा आरोप करणे निंदनीय आहे. आमदारांनी पैसे घेतले होते, तर ३ वर्षांपासून कारवाई का झाली नाही?, आरोपात तथ्य असेल तर कारवाई व्हायला हवी होती. याशिवाय पायलट म्हणाले की 2020 मध्ये सीएम गेहलोत यांचे सरकार पाडणे आणि वाचवण्याबाबत जो विरोधाभास दिसत आहे तो आता साफ केला पाहिजे. वसुंधरा राजे आणि अशोक गेहलोत यांची मिलीभगत आहे. अशा गोष्टींमुळेच कारवाई का होत नाही हे आता मला समजले आहे.

2020 च्या मानेसर घटनेची आठवण करून देताना पायलट म्हणाले की, आम्हाला सरकारमध्ये नेतृत्व बदल हवा होता, त्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो, त्यानंतर हायकमांडने आमचे म्हणणे ऐकले आणि त्यानंतर आम्ही राज्यसभेच्या प्रत्येक कार्यक्रमात शिस्तीने काम केले. पक्षाच्या निवडणुका, पक्ष मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

गेहलोत-पायलट वाद का?

गेहलोत यांनी अलीकडेच धौलपूरमध्ये म्हटले होते की, पायलट कॅम्पच्या आमदारांना अमित शहा यांनी कोट्यवधी रुपये दिले होते, ते आता परत केले पाहिजेत. धोलपूरमध्ये पायलटच्या बंडाचा मुद्दा उपस्थित करून गेहलोत यांनी त्यांच्या पक्षावरील त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या आधीही गेहलोत यांनी पायलट यांना देशद्रोही म्हटले आहे. याशिवाय 25 सप्टेंबरच्या घटनांचा संदर्भ देत पायलट म्हणाले की, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता, हा सोनिया गांधींचा अपमान होता असे गेहलोत म्हणाले होते.

पायलट वेगळा मार्ग निवडणार?

आपली तीव्र वाणी सुरूच ठेवत पायलट म्हणाले की, मी नेहमीच जनतेचा आवाज ऐकत आलो असून आता जनता जनार्दन माझं भवितव्य ठरवेल. मी तरुणाईला न्याय देण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जनसंघर्ष यात्रा काढणार आहे. यात पायलट यांच्या म्हणण्यानुसार, ते १२५ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

Web Title: Rajasthan politics Sachin Pilot gives warning to CM Ashok Gehlot people will decide future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.