शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांत राजेंना हादरा

By admin | Published: August 20, 2015 11:22 PM

राजस्थानच्या पालिका निवडणुकीतील ‘करा किंवा मरा’च्या लढाईत भाजपने काँग्रेसवर निसटती मात केली असली तरी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र दुष्यंत यांचा

शीलेश शर्मा, नवी दिल्लीराजस्थानच्या पालिका निवडणुकीतील ‘करा किंवा मरा’च्या लढाईत भाजपने काँग्रेसवर निसटती मात केली असली तरी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र दुष्यंत यांचा गड मानल्या जाणाऱ्या झालाबाडमध्ये ३५ पैकी २२ जागा पटकावत काँग्रेसने हादरा दिला आहे. एकूण ३३५१ वॉर्डपैकी १४४३ वॉर्डवर ताबा मिळवित भाजपने पहिले स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि अपक्षांनी संयुक्तरीत्या १९०८ जागा पटकावत सत्ताधारी आघाडीच्या तोंडचे पाणी पळविले आहे. अजमेर महापालिकेवरही काँग्रेसने झेंडा फडकावला.मध्य प्रदेश पालिका निवडणुकींनी निराशा पदरी पडलेल्या काँग्रेसला दिलासा देणारा निकाल राजस्थानने दिला आहे. वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ढोलपूर- झालावार मतदारसंघातील झालाबाड-झालरापाटन पालिकेत काँग्रेसची सत्ता सुनिश्चित झाली आहे. तेथे गेल्या १५ वर्षांपासून भाजपची एकखांबी सत्ता होती. राजस्थानमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला मध्य प्रदेशात पुन्हा अपयश कसे आले, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना किंवा मध्य प्रदेशच्या प्रदेश नेतृत्वाला देता आलेले नाही. कमलनाथ, दिग्विजयसिंग, ज्योतिरादित्य आपसातील संघर्षात मश्गुल राहिले. या नेत्यांना दिल्लीतून उसंत मिळाली नाही. मध्य प्रदेशकडे ते कसे लक्ष देणार? आजही या राज्यात काँग्रेसला पुन्हा उभे करण्यासाठी वेळ देऊ शकणारा एकही प्रदेश नेता नाही. दुसरीकडे या पक्षाने सचिन पायलट यांना मैदानात उतरवून कार्यकर्त्यांची एकजूट घडवून आणली. प्रभारी सरचिटणीस गुरुदास कामत यांनीही पायलट यांच्या जोडीला परिश्रम घेतल्याचे हे फळ आहे. मध्य प्रदेशातील चुकीची जाणीव राहुल गांधी यांनाही झाली आहे. राजस्थानच्याच धर्तीवर मध्य प्रदेशमध्येही बदल घडवून आणताना नेत्यांवर लगाम कसण्यासाठी ते लवकरच विचारमंथन करतील असे मानले जात आहे.