नवी दिल्ली:राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी 23 फेब्रुवारी रोजी विधानसभेत राजस्थानचा 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला. यानंतरच दरवेळीप्रमाणेच आमदारांना महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या. राजस्थानचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व 200 आमदारांना (MLA) Apple iPhone 13 देण्यात आला. आमदारांना सुमारे 75 हजार ते एक लाख रुपये किमतीचे आयफोन 13 देण्यात आले आहेत.
सरकारने इतके फोन मागवलेमिळालेल्या माहितीनुसार, सरकारने नुकतेच 250 iPhone खरेदी केले आहेत. त्यापैकी 200 आयफोन विधानसभा सदस्यांना देण्यात येणार आहेत. हा फोन आमदारांना देण्यापूर्वी विधानसभेचे अॅपही अपग्रेड करण्यात आले. राज्य सरकार आमदारांना एवढी महागडी भेट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अर्थसंकल्पात आमदारांना अनेक महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या आहेत.
1 कोटी 33 लाख महिलांना स्मार्ट फोन देण्याचे आश्वासनसरकारने अर्थसंकल्पात राज्यातील 1 कोटी 33 लाख महिलांना स्मार्ट फोन देण्याचा निर्णयही घेतला आहे. हे मोबाईल मुख्यमंत्री डिजिटल सेवा योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत. 33 लाख चिरंजीवी कुटुंबातील महिला प्रमुखांना 3 वर्षांची इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेले हे मोबाईल दिले जातील.
आमदारांना अनेक भेटवस्तू2021-22 चा अर्थसंकल्प सभागृहात सादर झाल्यानंतर, बजेटशी संबंधित कागदपत्रे ब्रीफकेसमध्ये ठेवून आमदारांना अॅपलचे आय-पॅड देण्यात आले होते. त्याआधीही बजेटमध्ये लॅपटॉप देण्यात आले होते. त्याचबरोबर यावेळी आमदारांची नवीन निवासस्थानेही बांधली जात आहेत. जयपूरमध्ये आमदारांना मानसरोवरमध्ये फ्लॅट देण्यात आले आहेत. ते देखील अतिशय सवलतीच्या दरात दिले जातात.