नवी दिल्ली : राजस्थानमधील भरतपूरमध्ये एका तरूणाने आजारी प्रेयसीला भेटल्यानंतर हॉस्पिटलमधून उडी मारून आत्महत्या केली. मथुरा गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जिल्हा रुग्णालयात हा तरुण रात्री उशिरा मेडिकल वॉर्डमध्ये दाखल असलेल्या महिलेला भेटण्यासाठी आला आणि त्यानंतर सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणाने उडी मारण्यापूर्वी रुग्णालयात दाखल महिलेला मिठी मारल्याचे पाहायला मिळत आहे. मग बाय-बाय असे हावभाव करत सहाव्या मजल्यावर तो पोहोचतो आणि तिथून उडी मारतो.
दरम्यान, चिकना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुंघ इक्रान गावात राहणारा चंद्रपाल 3 जानेवारी रोजी रात्री रुग्णालयात असलेल्या महिलेला भेटायला गेला होता. तो बाथरूमकडे बोट दाखवत महिलेला बोलावतो. दोघेही एकमेकांना मिठी मारून थोडा वेळ चर्चा करतात. मिठी मारल्यानंतर तो सहाव्या मजल्यावर चढून महिलेकडे इशारा करत तिथून उडी मारल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.
हॉस्पिटलमधून उडी मारून संपवलं जीवन सहाव्या मजल्यावरून उडी मारल्यावर तरूणाचा मृत्यू झाला. माहिती मिळताच नातेवाईक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर खिडकीतून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
घटना CCTVमध्ये कैद मथुरा गेटचे स्टेशन अधिकारी रामनाथ यांनी सांगितले की, एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नातेवाईकांनी सांगितले आहे की, तो रुग्णालयात असलेल्या महिलेला पाहण्यासाठी गेला होता. तेव्हा खिडकीतून बाहेर डोकावत असतना तेथून खाली पडला अन् त्याचा मृत्यू झाला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"