कोलकाता : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (आरसीबी) थरारक विजय मिळवताना लखनौ सुपरजायंट्सला १४ धावांनी नमवले. यासह आरसीबीने दुसऱ्या क्वालिफायर लढतीत प्रवेश केला. लखनौचे आव्हान संपुष्टात आले आहे.
इडन गार्डन्स स्टेडियमवर रजत पाटीदारच्या तुफानी नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने लखनौला २०८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र, लखनौला ६ बाद १९३ धावाच करता आल्या. कर्णधार लोकेश राहुलने शानदार अर्धशतक झळकावले, परंतु त्याच्या खेळीत आक्रमकता नव्हती. येथेच लखनौच्या धावगतीवर परिणाम झाला. दीपक हूडाने चांगली फटकेबाजी करत राहुलला चांगली साथ दिली. मात्र, इतर फलंदाज अपयशी ठरले. जोस हेझलवूडने ३ बळी घेत मोक्याच्यावेळी लखनौला दडपणात आणले. अंतिम फेरीसाठी आरसीबी शुक्रवारी राजस्थानविरुद्ध भिडेल. त्याआधी, ऐन मोक्याच्यावेळी रजत पाटीदारने केलेल्या दणकेबाज फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने द्विशतकी मजल मारली. पाटीदार व दिनेश कार्तिक यांनी वादळी फटकेबाजी करताना पाचव्या गड्यासाठी ४१ चेंडूंत नाबाद ९२ धावांची तुफानी भागीदारी केली. पाटीदारने केवळ ४९ चेंडूंत शतक पूर्ण केले. कर्णधार फाफ डूप्लेसिस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल अपयशी ठरल्यानंतर पाटीदार-कार्तिक यांनी संघाला सावरले. अभ्यास केला प्लेसिस-कोहलीचा आणि प्रश्न पडला रजत पाटीदारचा, अशीच अवस्था लखनौची झाली. रजतने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत लखनौची धुलाई केली.
n प्ले ऑफमध्ये शतक झळकावणारा रजत पाटीदार पहिलाच 'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय अनुभव नसलेला) खेळाडू ठरला.
पावसाचा व्यत्यय!एलिमिनेटर सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पावसाने थोडावेळ ‘खेळी’ केल्याने नाणेफेकीला उशीर झाला. यामुळे नेहमी ७ वाजता होणारी नाणेफेक ७.५५ वाजता झाली. तसेच, सामनाही ७.३० ऐवजी ८.१० वाजता सुरू झाला. पावसामुळे एकवेळ गंभीर स्थिती निर्माण झाल्याने सामन्याच्या आयोजनाबाबत चिंता वाढली होती. यादरम्यान संपूर्ण इडन गार्डन्सचे मैदान प्लास्टिक कव्हरने झाकण्यात आले होते. मात्र, काही वेळाने पावसाने विश्रांती घेताच कव्हर बाजूला करण्यात आले आणि सर्वांना, विशेष आरसीबी संघाला आनंद झाला.
खेळाडू विराट कोहली झे. मोहसिन गो. आवेश २५ २४ २/० १०४डुप्लेसिस झे. डिकाॅक गो. मोहसिन ०० ०१ ०/० ०००रजत पाटीदार नाबाद ११२ ५४ १२/७ २०७मॅक्सवेल झे. लेविस गो. पांड्या ०९ १० ०/१ ९०लोमरोर झे. राहुल गो. बिश्नोई १४ ०९ २/० १५५दिनेश कार्तिक नाबाद ३७ २३ ५/१ १६०
गोलंदाज षटक डॉट धावा बळी मोहसिन खान ४ १३ २५ १ दुष्मंत चामिरा ४ ०७ ५४ ० कृणाल पांड्या ४ ०४ ३९ १ आवेश खान ४ १० ४४ १ रवी बिश्नोई ४ ०८ ४५ १
खेळाडू डिकॉक झे.डुप्लेसिस गो. सिराज ०६ ०५ ००/१ १२०राहुल झे. शाहबाज गो. हेजलवूड ७९ ५८ ३/५ १३६मनन वोहरा झे. शाहबाज गो. हेजलवूड १९ ११ १/२ १७२दीपक हुडा त्रि. गो. हसरंगा ४५ २६ १/४ १७३स्टोयनिस झे.पाटीदार गो. पटेल ०९ ०९ ०/१ १००एविन लेविस नाबाद ०२ ०६ ०/० ०३३कृणाल पांड्या झे. आणि गो. हेजलवूड ०० ०१ ०/० ०००चामिरा नाबाद ११ ०४ १/१ २७५