नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार व इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी ६४ व्या जन्मदिनी उत्तराखंडच्या नैसर्गिक आपत्तीमधील मजुरांसाठी ६४ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, स्वामी बाबा रामदेव, कवि कुमार विश्वास, अभिनेता सलमान खानसह अनेक मान्यवरांनी रजत शर्मा यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आभार व्यक्त केले आहेत.एका ट्विटद्वारे शर्मा यांनी म्हटले आहे की, आपल्यासाठी तर सर्वच जगतात, परंतु परोपकारासाठी जगणेच खरे जगणे आहे. त्यामुळे मी नम्रपणे हे योगदान देत आहे.मागील २८ वर्षांपासून त्यांचा आप की अदालत कार्यक्रम सुरू आहे. त्यांनी पीएम केअर फंडातही मोठे योगदान दिलेले आहे. दिल्लीतील एम्समध्ये इलाजासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी बॅटरी संचलित बस सुविधेसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
रजत शर्मा यांनी ६४ व्या वाढदिवशी केले ६४ लाख रुपयांचे दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 06:36 IST