रांची : झारखंडच्या टाना भगतांच्या आदोलनामुळे दिल्ली-रांची रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी दिल्लीहून रांचीला जाणारी राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना 9 तासांनी बसने रांचीला पाठविण्यात आले. या दरम्यान एका महिलेने बसने जाण्यास नकार दिल्याचे वृत्त पसरले होते. ती महिला ट्रेननेच रांचीला जाणार असल्याच्या मागणीवर ठाम राहिली आणि त्या महिलेसाठी रेल्वेने राजधानी एक्सप्रेस सोडल्याचे हे वृत्त अखेर खोटे ठरले.
धनबाद झोनचे वरिष्ठ डीसीएम एके पांडे यांनी हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. ट्रेनला डीटीओमध्ये आणण्यात आले होते, मात्र कोणतेही सकारात्मक संकेत न दिसल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व प्रवाशांना बसने रांचीला रवाना केले. कोणत्याही प्रवाशासाठी पुढे ट्रेन गेली नाही. आधीच्या वृत्तानुसार राजधानी एक्स्प्रेसमध्ये एकूण 930 प्रवासी होते. त्यांना ट्रेन पुढे जाऊ शकत नसल्याने बसने पाठविण्यात आले. मात्र, यावेळी एका अनन्या नावाच्या तरुणीने बसने पुढे जाण्यास नकार दिला. अनन्या मुलसरायहून ट्रेनमध्ये बसली होती. तिला रांचीला जायचे होते. ती वारानसीला लॉ शिकत आहे.
'पाब्लो' जगातील सर्वात मोठा ड्रग माफिया! पैसा एवढा की वाळवी खात होती, क्रूरतेचा विचारच नको
अनन्या हट्टा पेटल्याने तिला रेल्वे अधिकारी, सह प्रवाशांनी एकटीसाठी ट्रेन जाऊ शकत नसल्याचे समजावले परंतू तिने पुढे जाण्यास नकार दिला. प्रवाशाला त्याच्या इच्छित स्थानकावर सोडण्याचा रेल्वेची जबाबदारी आहे, त्यामुळे मी बसने जाणार नाही, असे ती म्हणाली होती. यानंतर ही गोष्ट दिल्लीतील मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत गेली आणि त्यांनी त्या मुलीसाठी ट्रेन चालविण्याचे आदेश दिले.
दिल्ली रांची मार्ग बंद असल्याने ही ट्रेन गया येथे पाठविण्यात आली. तिथून ती गोमो आणि बोकारोहून रांचीला पोहोचली, असे या वृत्तामध्ये म्हटले होते. ही ट्रेन रात्री 1.45 वाजता पोहोचली. या ट्रेनमध्ये रेल्वे कर्मचारी आणि केवळ अनन्याच होती. तिच्या सुरक्षेसाठी आरपीएफ जवानही होता. रेल्वेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल असे म्हटले होते. ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली होती. अखेर ती फेक निघाली.
EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'
रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणार
IMP: कार चालविताना मास्क बंधनकारक? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा
चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा