आदिवासी बांधवांसमवेत एक दिवस राजे संभाजी ग्रुप : दिवाळीनिमित्त गरजूंना विविध वस्तूंचे वाटप
By admin | Published: October 30, 2016 10:46 PM
सिडको : येथील राजे संभाजी ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसमवेत एक दिवस दिवाळी साजरी करून भोजनाचा आनंद घेण्यात आला. यावेळी ग्रुपच्या वतीने आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याचे हंडे, मिठाई तसेच शालेय बॅगसह विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सिडको : येथील राजे संभाजी ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसमवेत एक दिवस दिवाळी साजरी करून भोजनाचा आनंद घेण्यात आला. यावेळी ग्रुपच्या वतीने आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याचे हंडे, मिठाई तसेच शालेय बॅगसह विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. सिडकोतील राजे संभाजी ग्रुपच्या वतीने संस्थापक मामा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी दिवाळी सणानिमित्त एक दिवस आदिवासी बांधवांसमवेत घालविण्यात येतो. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत ग्रुपच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. यंदाच्या वर्षीही त्र्यंबकेश्वर येथील बर्डीपाडा, तालुका पेठ येथील आदिवासी बांधवांसमवेत दिवाळी सण साजरा करण्यात आला. याठिकाणी आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी हंडे देण्यात आले. तसेच येथील मुलांना व गरजूंना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राजे संभाजी ग्रुपचे मामा ठाकरे, अनिल अमृतकर, कोचर, अनिल चव्हाण, एस. एस. दराडे, बाविस्कर, रवि राठोड, बापू देवरे, शेवाळे, अण्णा साळुंखे, सागर पाठक, ॲड. मोरे, बाळासाहेब सोनवणे, विष्णू कोठावदे, तुषार कोठावदे, मंगेश अनासने, शेळके, महाले आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)फोटो ओळी : आर फोटोला ३० सिडको न्यू या नावाने सेव्ह केला आहे.आदिवासी बांधवांसमवेत मामा ठाकरे, अनिल अमृतकर, कोचर, बापू देवरे आदि.