नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींना सोडण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सरकारने नलिनीसह सहा दोषींना शिक्षेतून सूट देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दोषींना सोडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर नलिनीसह सहा दोषींची तुरुंगातून सुटका करण्यात आली.
राजीव गांधी हत्येप्रकरणी नलिनी आणि पी रविचंद्रन यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नलिनी, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. यापूर्वी 18 मे 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील आणखी एका दोषी पेरारिवलनला सोडण्याचे आदेश दिले होते. उर्वरित दोषींनीही याच आदेशाचा हवाला देत कोर्टाकडून सुटकेची मागणी केली होती. न्यायालयाने हे मान्य केले की पेरारिवलन प्रकरणातील SC चा निर्णय उर्वरित 6 दोषींनाही लागू होतो.
काँग्रेसने निर्णयाला चुकीचे म्हटले राजीव गांधी हत्येतील दोषींच्या सुटकेला काँग्रेसने दुर्दैवी आणि चुकीचे म्हटले. दोषींना सोडले जाऊ नये असे काँग्रेसने म्हटले होते. ही हत्या माजी पंतप्रधानांशी संबंधित आहे, एखाद्या सामान्य व्यक्तीशी संबंधित नाही, असे काँग्रेसने म्हटले. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषींना सोडण्याच्या मुद्द्यावर मला यात कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले होते. पेरारिवलनच्या सुटकेवर राहुल यांनी हे वक्तव्य केले.
नलिनीला भेटल्यावर प्रियांका रडत होतीसुप्रीम कोर्टातून सुटका झाल्यानंतर दोषींपैकी एक असलेल्या नलिनीने सरकारचे आभार मानले. तमिळनाडूच्या जनतेचेही तिने आभार मानले. काँग्रेस नेत्या आणि राजीव गांधी यांची कन्या प्रियांका गांधीही 2008 मध्ये तुरुंगात नलिनी यांना भेटायला गेल्या होत्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नलिनीने सांगितले की, प्रियंका तिच्यासमोर रडत होत्या. नलिनीने राजीव गांधींच्या हत्येशी संबंधित सर्व गोष्टी प्रियांकाला सांगितल्या होत्या.