राजीव गांधींनी नौकेचा गैरवापर केला नाही, दोन माजी नौदलप्रमुखांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:15 AM2019-05-10T05:15:12+5:302019-05-10T05:16:31+5:30
भारतीय नौदलाच्या विराट या युद्धनौकेचा वापर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या कुटुंबीयांच्या खासगी सुट्यांसाठी केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खोडून काढला आहे.
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या विराट या युद्धनौकेचा वापर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या कुटुंबीयांच्या खासगी सुट्यांसाठी केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खोडून काढला आहे.
व्हाइस अॅडमिरल (निवृत्त) विनोद पसरिचा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, राजीव गांधी यांनी कुटुंबीयांसह विराट नौकेला औपचारिक भेट दिली, तेव्हा त्यांच्यासमवेत एकही विदेशी व्यक्ती वा मित्रपरिवार नव्हता. पंडित जवाहरलाल नेहरू हाँगकाँग दौºयावर गेले तेव्हा त्यांच्यासोबत कुटुंबीय होते. विराटवरील हेलिकॉप्टर राहुल गांधी यांनी नव्हे तर राजीव, सोनिया गांधी यांच्यासाठी वापरण्यात आले. राजीव गांधी यांनी परिवारासह भेट दिली त्यावेळी विराटचे नेतृत्व विनोद पसरिचा करत होते.
राजीव गांधी व परिवाराने विराट युद्धनौकेचा मनोरंजनासाठी टॅक्सीसारखा वापर केला हा मोदींनी केलेला आरोप निव्वळ चुकीचाच नाही तर नौदलाची बदनामीही करणारा आहे अशी टीका व्हाइस अॅडमिरल (निवृत्त) आय. सी. राव यांनी केली. ते म्हणाले की, संरक्षण व नौदलाच्या शिष्टाचारांनुसार, पंतप्रधानांच्या औपचारिक दौºयावर युद्धनौका किंवा हेलिकॉप्टर वापरण्यात काहीही
गैर नाही. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक
असते.
मोदी खोटे बोलतात - काँंग्रेस
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सांगितले की, राजीव गांधींनी केवळ सरकारी दौºयावर असतानाच आपल्या कुटुंबियांसह विराटला भेट दिली होती; पण वस्तुस्थितीचा मोदी विपर्यास करीत आहेत. पाच वर्षांत लक्षणीय कामगिरी करू न शकलेल्या मोदींकडे सांगण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे ते निवडणूक प्रचारात वारंवार खोटे बोलत आहेत. बेकारी व नोटाबंदीसारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढविण्याची हिम्मत नसलेले मोदी नको त्या गोष्टी उकरून वारंवार खोटे बोलत आहेत.