नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी बाबरी मशीद कुलूप उघडण्याचे आदेश दिले होते असं विधान माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी केलं होतं. यावर माधव गोडबोले यांच्या विधानात तथ्य असल्याचे सांगत एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांनी समर्थन केलं आहे.
असुदुद्दीन ओवैसी म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी बाबरी मशीद कुलूप उघडण्याचे आदेश दिले होते व हे सत्य आहे. तसेच राजीव गांधी यांनी अयोध्यामधून आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली असल्याचे देखील असुदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. बाबरीचे जेव्हा कुलूप उघडले तेव्हा काँगेस पक्षच सत्तेत होता आणि काँग्रेसचे पी. व्ही. नरसिम्हा राव हे पंतप्रधान होते असं असुदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले आहे.
1992मध्ये राजीव गांधी बाबरी मशीदीचे कुलूप उघडण्याच्या हद्दीपर्यंत गेले, पंतप्रधान म्हणून त्यांच्या काळात मंदिराचा पायाभरणीचा समारंभ पार पडला. म्हणूनच मी त्यांना चळवळीचा दुसरा कारसेवक म्हटले असं माधव गोडबोले यांनी सांगितले होते. तसेच राजीव गांधी यांनी जर सक्रियता दाखवून आयोध्येबाबत त्यावेळीच योग्य निर्णय घेण्याची संधी त्यांच्याकडे होती, कारण तेव्हा तर दोन्ही बाजूंनी राजकीय पदे मजबूत नव्हती. तसेच देण्याची व घेण्याची शक्यता होती आणि तोडगा निघू शकला असता असं माधव गोडबोले यांनी सांगितले होते.