शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

राजीव गांधी यांची जयंती देशभर साजरी

By admin | Published: August 21, 2016 3:43 AM

देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७२व्या जयंतीनिमित्त शनिवारी देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नवी दिल्ली : देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७२व्या जयंतीनिमित्त शनिवारी देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्यांच्या वीरभूमी या समाधीस्थळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह विविध नेत्यांनी पुष्पांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. तथापि, कॉंग्रेस उपाध्यक्ष राजीव गांधी यांनी पुष्पांजली वाहिली. राष्ट्रपतींबरोबरच उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय माकन, ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, मोतीलाल व्होरा, भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी समाधीस्थळी आदरांजली वाहिली. शारीरिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या १०० जणांना राहुल गांधी यांनी वाहनांचे वाटप कले. यातील बहुतांश जण २० ते ३० वयोगटातील आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. राजीव गांधी फाउंडेशनतर्फे दरवर्षी अशा प्रकारे मदतीचे वाटप केले जाते. राहुल गांधी या फाउंडेशनचे विश्वस्त आहेत.राजीव गांधी यांनी १९८१ पासून १९९१पर्यंत संसदेत प्रतिनिधित्व केलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीव गांधी यांच्याबाबतच्या अनेक आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना वंदन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)टिष्ट्वटमुळे वाद कोलकाता : राजीव गांधी जयंतीनिमित्त पश्चिम बंगाल काँग्रेसच्या टिष्ट्वटर अकाउंटवर जारी केलेल्या एका वादग्रस्त टिष्ट्वटने वादाला तोंड फुटले. जेव्हा मोठा वृक्ष पडतो, तेव्हा धरणी हादरते- राजीव गांधी, अशा आशयाचे हे टिष्ट्वट होते. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीखविरोधी दंगल उसळली होती. त्या वेळी ही टिप्पणी करण्यात आली होती. त्या वेळीही यामुळे वाद उद्भवला होता. शनिवारी या टिष्ट्वटबाबत तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर ते हटवण्यात आले. दरम्यान, हे टिष्ट्वट आमच्याकडून नव्हे, तर कोणीतरी हॅक करून ते पोस्ट केले आहे, असे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी सांगितले.