शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:09 PM

राजकोट येथे झालेल्या भीषण अग्नितांडवामध्ये 9 मुलांसह 28 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

Rajkot Game Zone Fire : गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये 25 मे रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण अग्नितांडवामध्ये 9 मुलांसह 28 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आग इतकी भीषण होती की, अनेकांचा जळून कोळसा झाला, त्यांची ओळखही पटवणे अवघड झाले होते. DNA चाचणीच्या मदतीने अनेकांची ओळख पटवण्यात आले. विशेष म्हणजे, या मृतांमध्ये गेम झोनच्या मालकाचाही समावेश आहे. 

या आगीत गेम झोनचे मालक प्रकाश हिरण यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अवशेषांचे DNA नमुने आईशी जुळल्यामुळे त्यांची ओळख पटली. आग लागली त्यावेळी प्रकाश हिरण हे देखील सीसीटीव्हीत कैद झाले होते. आगीच्या घटनेनंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नव्हता, सर्व फोन नंबरही बंद होते. यानंतर प्रकाश यांचा भाऊ जितेंद्रने पोलिसांकडे डीएनए चाचणीसाठी निवेदन दिले होते. 

उच्च न्यायालयाने प्रशासनाला फटकारलेटीआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणीगुजरात उच्च न्यायालयाने स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारला कठोर शब्दांमध्ये फटकारले. एवढ्या वर्षांपासून विना एनओसी हा प्रकार सुरू होता, अधिकारी झोपले होते का? आमचा स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर विश्वास नाही. तुम्ही आंधळे झाले होते, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने सरकारला सुनावले आहे. आगीच्या घटनेची उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत प्रकरण दाखल करून घेतले होते, त्यावर सोमवारी सुनावणी झाली.

कशामुळे लागली आग?

गेमिंग झोनमधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात दिसते की, पहिल्या मजल्यावर एका ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याच्या खाली फोम शीट, प्लास्टिकचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणात थर्माकोलच्या शीट व इतर साहित्य ठेवले होते. त्यावर वेल्डिंगच्या ठिणग्या पडल्या आणि त्यामुळे आग लागली. कर्मचाऱ्यांना आग विझविण्यात अपयश आले. अवघ्या दोन-तीन मिनिटांमध्येच आगीने रौद्ररुप धारण केले. 

 

टॅग्स :GujaratगुजरातfireआगDeathमृत्यूPoliceपोलिस