नवी दिल्ली: अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन (Lloyd Austin) यांनी सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंधांवर चर्चा केली. एनएसएला भेटण्यापूर्वी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्याशीही चर्चा केली. यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान विश्वासघाती आहे, अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रे देऊ नयेत, असा इशाराही दिला.
संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन आणि NSA अजित डोवाल यांच्या भेटीबाबत माहिती शेअर करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, ऑस्टिन आणि डोवाल यांनी सागरी, लष्करी आणि एरोस्पेस क्षेत्रात क्षमता वाढवण्यासाठी सहकार्यावर चर्चा केली. लॉयड ऑस्टिन यांनी भारताच्या 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचे जास्तीत जास्त हस्तांतरण, सह-उत्पादन आणि स्वदेशी क्षमतांवर भर दिला.
राष्ट्रीय प्राधान्यक्रमाच्या आधारे निर्णय घ्यावाबैठकीत यूएस संरक्षण सचिव आणि NSA यांनी सहमती दर्शवली की मध्य पूर्व, दक्षिण आशिया, दक्षिण पूर्व आशिया आणि इंडो-पॅसिफिकमधील देशांनी त्यांच्या राष्ट्राच्या प्राधान्यांनुसार कारवाईचे स्वातंत्र्य राखले पाहिजे. त्याला कोणताही वाईट पर्याय निवडण्यास भाग पाडू नये.
पाकिस्तानवर विश्वास ठेवू नका : राजनाथ सिंहपाकिस्तानवर शस्त्रास्त्रांबाबत विश्वास ठेवता येणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांना दिला. या प्रकरणात पाकिस्तान विश्वासार्ह नाही. शस्त्रे आणि तंत्रज्ञानाच्या गैरवापरासाठी पाकिस्तान आधीच कुप्रसिद्ध आहे. त्याला शस्त्रे पुरविल्यास संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले.