हरीश गुप्ता, नवी दिल्लीकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेसाठी काम करण्याची तयारी दर्शविली असतानाच पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे रा. स्व. संघाने करडी नजर लावल्याने संघ परिवारात सर्व काही आलबेल नसल्याचेच स्पष्ट संकेत मिळाले आहेत.मोदी सरकारमध्ये नंबर दोन असलेले राजनाथ सिंह यांनी अलीकडेच सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूर मुख्यालयी भेट घेऊन गृहमंत्रिपद सोडण्याची आणि परत पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी भागवत यांना सरकार सोडण्यासाठी मागितलेली परवानगी त्यांची नाराजीच सूचित करते. मे २०१४ मध्ये भागवतांच्या आदेशावरूनच राजनाथ सिंह भाजपाचे पक्षाध्यक्षपद सोडून सरकारमध्ये सामील झाले होते. त्यांना आता सरकारमध्ये कायम राहणे अवघडल्यासारखे वाटू लागले आहे.
राजनाथ सिंह देणार राजीनामा?
By admin | Published: May 18, 2015 4:58 AM