दसऱ्याच्या दिवशी भारतात शस्त्रे पुजण्याची परंपरा आहे. या दिवशी रावणाचा श्री राम यांनी वध केला होता. या सणाचे औचित्य साधून भारताचे पहिले राफेल विमान पुजले जाणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 8 ऑक्टोबरला राफेलचे पहिले विमान आणण्यासाठी जाणार आहेत. याचवेळी ते या लढाऊ विमानाची पूजा करतील.
राजनाथ यांच्या जवळच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गृह मंत्री असल्यापासून दसऱ्याला शस्त्रांचे पूजन करतात. आता संरक्षण मंत्री म्हणून ही परंपरा कायम ठेवणार आहेत. ते लवकरच पॅरिसला रवाना होतील. यावेळी ते फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो यांची भेट घेणार आहेत.
यानंतर ते बोर्डेऑक्सला जाणार आहेत. तेथे भारताचे बहुप्रतिक्षित पहिले राफेल लढाऊ विमान स्वीकारणार आहेत.