Rajouri Encounter: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बाजीमल भागात आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यादरम्यान, सुरक्षा दलांनी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. काल दहशतवादी कमांडरदेखील चकमकीत मारला गेला आहे. कारी हा डांगरी आणि कांडी दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड मानला जातो. गोळीबार थांबला असला तरी लष्कराची शोधमोहीम सुरू आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कारी हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी नेता होता. गेल्या एक वर्षापासून तो राजौरी-पुंछमध्ये आपल्या गटासह सक्रिय होता. तो डांगरी आणि कांडी हल्ल्याचा मास्टरमाईंडही मानला जातो. या भागात दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी त्याला पाठवण्यात आले होते. तो IED तज्ञ आणि प्रशिक्षित स्निपर होता, गुहांमध्ये लपून काम करायचा. भारतीय सैन्यातील शहीदांमध्ये दोन अधिकारी आणि दोन सैनिकांचा समावेश आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत भारतीय सैन्याचे पाच जवान शहीद झाले आहेत. यात कॅप्टन एमव्ही प्रांजल, कॅप्टन शुभम गुप्ता, हावलदार अब्दुल माजिद, संजय बिश्ट आणि सचिन लारूर यांचा समावेश आहे.