Raju Srivastav Health: स्टार कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) व्हेंटिलेटरवर असून, गेल्या 13 दिवसांपासून दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. ते हळुहलू रिकव्हर होत आहे. राजू श्रीवास्तव बरे होतील, पण थोडा वेळ लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजू यांच्या आरोग्यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. दरम्यान, त्यांच्या सुरक्षेत एक मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे.
चाहता आयसीयूत शिरलाएका ऑनलाइन मीडिया पोर्टलच्या वृत्तानुसार, राजू यांना जिथे ठेवण्यात आले आहे, त्या आयसीयूत एक अज्ञात व्यक्ती शिरला. हा व्यक्ती स्वतःला राजूचा चाहता म्हणवून घेत होता. या व्यक्तीला राजू श्रीवास्तवसोबत सेल्फी घ्यायचा होता. याची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. या घटनेनंतर राजू श्रीवास्तव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या खोलीबाहेर एक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे.
राजूला संसर्गाचा धोका काही दिवसांपूर्वी एम्सच्या डॉक्टरांनी राजूच्या कुटुंबीयांना राजू यांना ज्या ठिकाणी दाखल केले आहे तेथे जाण्यास नकार दिला होता. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना संसर्गाचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून राजू श्रीवास्तव यांच्या जवळ कोणालाही जाऊ दिले जात नाही. पण अनोळखी व्यक्तीचे त्याच्याकडे येणे ही एका मोठ्या चिंतेपेक्षा कमी नाही. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
नेमकं काय झालं?राजू श्रीवास्तव यांना 9 ऑगस्ट रोजी व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले. मात्र, 18 ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या डॉक्टर राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करत आहेत. यासोबतच त्यांचे चाहतेही लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.