शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

Rajya Sabha Elecion: उद्या चार राज्यातील 16 जागांसाठी मतदान, कोणाचे पारडे जड..? जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 11:44 AM

Rajya Sabha Elecion: महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमधील राज्यसभेच्या जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यात राजस्थानातील 4, हरयाणातील 2, कर्नाटकातील 4 आणि महाराष्ट्रातील 6 जागा आहेत.

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकीबाबत देशभरात उत्सुकता लागली आहे. मतदान आणि निकाल लागायला अजून काही तास उरले आहेत. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीअंतर्गत 15 राज्यांत एकूण 57 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 41 सदस्य बिनविरोध निवडून आले. अशा स्थितीत आता केवळ 16 जागांवर निवडणूक होणार आहे.

या सर्व 16 जागांसाठी चार राज्यांमध्ये 10 जून रोजी मतदान होत आहे. तसेच, उद्याच सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत हॉर्स ट्रेडिंग आणि क्रॉस व्होटिंगच्या भीतीने सर्वच पक्ष आपापल्या आमदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात पक्षांतर्गत हेराफेरीचे राजकारणही सुरू आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना रिसॉर्ट किंवा अन्य ठिकाणी एकत्र ठेवले आहे. निवडणुकीच्या दिवशी त्यांना थेट मतदानासाठी नेले जाईल. जाणून घेऊन या चार राज्यांतील समीकरणे काय सांगतात...

महाराष्ट्र-महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा जिंकण्याइतपत संख्याबळ आहे, तर भाजपकडे दोन जागांसाठी पुरेसे आमदार आहेत. राज्यसभेवर उमेदवार पाठवण्याइतपत संख्याबळ शिवसेनेकडेही आहे. मात्र, सहाव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजप आपला तिसरा आणि शिवसेना आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

राजस्थान राज्यसभा निवडणूक-राजस्थानमध्ये चार जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी काँग्रेसकडून मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा हेही रिंगणात असून, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. काँग्रेसकडे स्वतःचे 108 आमदार आहेत. याशिवाय आरएलडीचे सुभाष गर्ग यांचाही पाठिंबा आहे. 13 अपक्ष, दोन सीपीएम आणि दोन बीटीपी आमदारांनीही काँग्रेसला पाठिंबा देण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत काँग्रेसला 126 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसला तिन्ही उमेदवारांसाठी 126 आमदारांच्या मतांची गरज आहे. 

हरियाणा राज्यसभा निवडणूक-हरियाणात राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कार्तिकेय शर्मा यांना भाजपचा पाठिंबा आहे. तसेच भाजपने कृष्णा पनवार यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून अजय माकन रिंगणात आहेत. सत्ताधारी भाजप-जेजेपी युती आपल्या 40 आमदारांच्या जोरावर एक जागा जिंकणार आहे. काँग्रेसचे विधानसभेत 31 आमदार असून ही दुसरी जागा जिंकण्यासाठी पुरेशी मते आहेत. 

कर्नाटक राज्यसभा निवडणूक-कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेत राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी 45 आमदार लागतात. विधानसभेत 70 आमदार असलेल्या काँग्रेसने जयराम रमेश आणि मन्सूर अली खान हे दोन उमेदवार उभे केले आहेत. दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला आणखी 20 मतांची गरज आहे. भाजपचे 121 आमदार आहेत. पक्षाने निर्मला सीतारामन, कन्नड चित्रपट अभिनेते जगेश आणि लहर सिंग यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपलाही आणखी 14 मतांची गरज आहे. जेडीएसकडे 32 आमदार आहेत. डी कुपेंद्र रेड्डी यांनाही त्यांनी मैदानात उतरवले आहे. रेड्डी यांना आणखी 13 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रRajasthanराजस्थानKarnatakकर्नाटकHaryanaहरयाणा