ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 11 - राज्यसभेच्या 27 जागांचे निकाल लागले आहेत. राजस्थानमध्ये भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू, ओम प्रकाश माथूर, हर्षवर्धन सिंग आणि राम कुमार वर्मा यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती. या चारही उमेदवारांनी बाजी मारली असून निवडणूक जिंकली आहे. तर उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने सात जागा जिंकल्या असून उर्वरित दोन जागा बहुजन समाज पक्षाने जिंकल्या आहेत. काँग्रेस उमेदवार कपिल सिब्बलदेखील विजयी झाले आहेत.
काँग्रेसचे प्रदीप टामटा यांनी अपक्ष उमेदवार अनिल गोएल यांचा पराभव करत उत्तराखंडमधली एकमेव जागा जिंकली आहे. मध्यप्रदेशात भाजपाचे एम जे अकबर आणि अनिल माधव दवे विजयी झाले असून काँग्रेसने समर्थन दिलेले उमेदवार विवेक तनखादेखील विजयी झाले आहेत. झारखंडमधील दोन्ही जागा भाजपाने जिंकल्या असून मुख्तार अब्बास नकवी आणि महेश पोद्दार विजयी झाले आहेत.
हरियाणामधून भाजपा उमेदवार बिरेंदर सिंग आणि भाजपाने समर्थन दिलेले उमेदवार सुभाष चंद्रा यांचा विजय झाला आहे. तर कर्नाटकमधून काँग्रसचे जयराम रमेश, ऑस्कर फर्नांडिस, केसी राममूर्ती यांनी बाजी मारली असून भाजपाच्या निर्मला सीतारमण विजयी झाल्या आहेत.
किती राज्यांत किती जागा
- राज्यसभेसाठी 15 राज्यांमध्ये 58 जागा रिकाम्या झाल्या होत्या. त्यापैकी 14-14 भाजप आणि काँग्रेसच्या होत्या.
- 7 जागा सपा, 5 जदयू, 3-3 बीजेडी आणि एआईएडीएमकेमधील आहेत.
- 2-2 जागा बसपा, डीएमके, एनसीपी आणि टीडीपी तसेच 1-1 जागा वायएसआर काँग्रेस, शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल यांच्या आहेत.
- 8 राज्यांतून 31 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
- 7 राज्यांतील 28 जागांवर मतदान
- 3 केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू, पीयूष गोयल आणि सुरेश प्रभु बिनविरोध निवडून आले आहेत.
राज्यसभेच्या जागा
उत्तरप्रदेश 11
राजस्थान 4
कर्नाटक 4
मध्य प्रदेश 3
झारखंड 2
हरियाणा 2
उत्तराखंड 1
Congress leader Pradeep Tamta elected to Rajya Sabha from Uttarakhand. pic.twitter.com/L2tq4Zp996— ANI (@ANI_news) June 11, 2016
Rajya Sabha elections: BJP's MJ Akbar and Anil Madhav Dave win from Madhya Pradesh pic.twitter.com/yvaW1mkR1Z— ANI (@ANI_news) June 11, 2016