Rajya Sabha: परदेशातून झूम कॉल अन् काँग्रेसची उमेदवार यादी फायनल झाली; मुकुल वासनिकही प्रतापगढ़ींचे नाव पाहून हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 03:46 PM2022-05-31T15:46:00+5:302022-05-31T15:47:09+5:30

Rajya Sabha Election Congress List: राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील खदखद अखेर बाहेर पडली आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी(Imran Pratapgadhi) यांना उमेदवारी दिल्याने पक्षात अनेक जण नाराज आहेत.

Rajya Sabha Election: Whose zoom call from london? Congress candidate list finalized; Mukul Wasnik was also shocked to see Imran Pratapgarh's name from Maharashtra | Rajya Sabha: परदेशातून झूम कॉल अन् काँग्रेसची उमेदवार यादी फायनल झाली; मुकुल वासनिकही प्रतापगढ़ींचे नाव पाहून हैराण

Rajya Sabha: परदेशातून झूम कॉल अन् काँग्रेसची उमेदवार यादी फायनल झाली; मुकुल वासनिकही प्रतापगढ़ींचे नाव पाहून हैराण

Next

काँग्रेसने महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने मोठी नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे आशिष देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. तर राज्यसभेची यादी ठरविण्यासाठी लंडनहून झूम कॉल झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे मुकुल वासनिक यांना देखील यादीत आपले नाव दुसऱ्याच राज्यात आणि प्रतापगढींचे नाव आपल्या राज्यात पाहून धक्का बसला होता. 

राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील खदखद अखेर बाहेर पडली आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी(Imran Pratapgadhi) यांना उमेदवारी दिल्याने पक्षात अनेक जण नाराज असल्याचं समोर आलं. काँग्रेस नेत्या नगमा यांनी १८ वर्षाची तपस्या कमी पडली अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. आता काँग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

रविवारी रात्री मुकुल वासनिक यांना दिल्लीच्या अकबर रोडवरून एक फोन आला होता. त्यावेळी त्यांना एका महत्वाच्या कागदावर तातड़ीने सही करायची असल्य़ाचे सांगण्यात आले. वासनिक आपल्या खोलीत गेले तेव्हा मल्याळी सहकारी नारायण दास हसत होते. वासनिक यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि कागद हातात घेऊन सही करण्यासाठी पेन उचलला. ती राज्यसभेच्या उमेदवारांची यादी होती. 

या यादीत वासनिक यांनी आपले नाव पाहिले. ते आठव्या नंबरवर होते, परंतू राज्याचे नाव भलतेच होते. त्यांनी महाराष्ट्रातून कोण हे तपासण्यासाठी नजर फिरवली तर इम्रान प्रतापगढीचे नाव दिसले आणि ते हैराण झाले. ही यादी पाहून हैराण झालेले वासनिक एकमेव नव्हते. काँग्रेसच्या यादीत प्रियांका गांधींच्या गोटातील राजीव शुक्ला, प्रमोद तिवारी आणि इम्रान प्रतापगढ़ी यांना स्थान मिळाले. तर रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि अजय माकन हे राहुल गांधींच्या जवळचे. पी. चिदंबरम, रणजित रंजन, विवेक तंखा, मुकुल वासनिक हे सोनिया गांधींच्या पसंतीचे होते. 

धक्कादायक बाब म्हणजे सुरजेवालांनाही त्यांचे राज्य मिळाले नाही. त्यांना हरियाणातून उतरविता आले असते परंतू त्यांना राजस्थानमधून उतरविण्यात आले. पहिल्या क्रमांकाला सुरजेवाला दुसऱ्या वासनिक यांचे नाव. हुड्डा यांनी यत्रतत्र ताकद वापरून सुरजेवालांचा पत्ता कापला हे जाहीर होते. परंतू प्रतापगढींचे काय? प्रतापगढी यांना एवढेच महत्वाचे होते तर अन्य कोणत्याही राज्यातून राज्यसभेवर पाठविले जाऊ शकले असते. महाराष्ट्रात क्रॉस व्होटिंगचा एक इतिहास आहे. सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यानंतरही राज्यसभेला त्यांच्या जवळच्या नेत्याचा पराभव झाला होता. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. 


 

Web Title: Rajya Sabha Election: Whose zoom call from london? Congress candidate list finalized; Mukul Wasnik was also shocked to see Imran Pratapgarh's name from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.