"ड्रग्ज आयुष्यातील वेदना कमी करतात; दारू, तंबाखूप्रमाणे कर भरुन वापरायला परवानगी द्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 04:19 PM2021-10-28T16:19:53+5:302021-10-28T16:21:53+5:30

Congress KTS Tulsi : ड्रग्ज हे जीवनावश्यक असून त्यामुळे जीवनातील वेदना कमी होतात, त्याचा समतोल वापर केला पाहिजे असं खासदार केटीएस तुलसी यांनी म्हटलं आहे. 

rajya sabha member Congress kts tulsi advocated drugs said it is necessity of life | "ड्रग्ज आयुष्यातील वेदना कमी करतात; दारू, तंबाखूप्रमाणे कर भरुन वापरायला परवानगी द्या"

"ड्रग्ज आयुष्यातील वेदना कमी करतात; दारू, तंबाखूप्रमाणे कर भरुन वापरायला परवानगी द्या"

Next

नवी दिल्ली - आर्यन खानच्या अटकेनंतर देशभरात ड्रग्ज प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. याच दरम्यान देशातील ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार केटीएस तुलसी (Congress KTS Tulsi) यांनी ड्रग्जवर अजब विधान केलं आहे. ड्रग्ज जीवनावश्यक असल्याचं म्हटलं आहे. ड्रग्जनाही गुटखा-दारू, सिगारेट यांच्यासारखी सूट देण्यात यावी. ड्रग्ज हे जीवनावश्यक असून त्यामुळे जीवनातील वेदना कमी होतात, त्याचा समतोल वापर केला पाहिजे असं खासदार केटीएस तुलसी यांनी म्हटलं आहे. 

केटीएस तुलसी यांनी ड्रग्जमुळे आयुष्यातील वेदना कमी होतात हे सांगताना "दारू, गुटखा, तंबाखूमुळेही हानी होते. मात्र यांच्यावर कर भरून त्याचे सेवन करू दिले जाते. मग ड्रग्ज का नाही? करवसुली झाल्यानंतर ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे" असं म्हटलं आहे. "अनेक प्रसंगी ड्रग्जच्या माध्यमातून औषधे घ्यावी लागतात, त्यामुळे ड्रग्जच्या वापरास परवानगी का देऊ नये? एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस) कायदा, 1985 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे कारण त्याचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो" असं देखील म्हटलं आहे. 

एनडीपीएस कायद्याचा वारंवार गैरवापर लोकांना अंमली पदार्थांच्या जास्त किंवा कमी वापराबाबत त्रास देण्यासाठी केला जातो. एनडीपीएस कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे अस केटीएस तुलसी य़ांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार केटीएस तुलसी हे देशातील कायदेतज्ज्ञ खासदार मानले जातात. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यादरम्यान तुलसी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बराच वेळ संवाद झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: rajya sabha member Congress kts tulsi advocated drugs said it is necessity of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.