शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

राज्यसभा सदस्य इलैयाराजांना करावा लागला जातीयवादाचा सामना, पुजाऱ्यांनी मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून रोखलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:23 IST

इलैयाराजा यांनी प्रसिद्ध श्रीविल्लिपुथूर अंदाल मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभागातर्फे करण्यात आले.

राज्यसभा खासदार तथा संगितकार इलैयाराजा यांना जातीय भेदभावाचा सामना करावा लागल्याचे वृत्त आहे. त्यांना तामिळनाडूतील श्रीविल्लिपुथूर येथील आंदल मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून रोखण्यात आल्याचे बोलले जात आहे. इलैयाराजा हे आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले संगीतकार आहेत. त्यांचा जन्म 3 जून 1943 रोजी तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यात एका दलित कुटुंबात झाला होता.

काय आहे प्रकरण -इलैयाराजा यांनी प्रसिद्ध श्रीविल्लिपुथूर अंदाल मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभागातर्फे करण्यात आले. मात्र ज्यावेळी त्यांनी अंदाल मंदिराच्या गर्भगृहात (मंदिराचा गाभारा) जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कथितपणे मंदिराचे अधिकारी आणि भक्तांनी त्यांना रोखले. प्रोटोकॉलच्या उल्लंघनाचा हवाला देताना त्यांनी कथितपणे त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर इलैयाराजा यांनी अर्थ मंडपमच्या बाहेरून प्रार्थना केली. यावेळी पुजाऱ्यांनी त्यांना हार घालून सन्मानित केले.

7000 हून अधिक गाणी - इलैयाराजा हे आपल्या संगितासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी प्रामुख्याने दक्षिण भारतीय भाषांमदील चित्रपटांना संगित दिले आहे. त्यांनी 7000 हून अधिक गिती रचली आहेत. याशिवाय त्यांनी वीस हजारहून अधिक कान्सर्टमध्येही भाग  घेतला आहे. त्यांना "इसैज्ञानी" (संगीत ज्ञानी) म्हणूनही ओळखले जाते.मिळाले आहेत अनेक मोठे पुरस्कार -इलैयाराजा यांना शताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण देऊनही गौरवण्यात आले आहे. 2012 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमधून शास्त्रीय गिटार वादनात सुवर्णपदक मिळाले आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूTempleमंदिरMember of parliamentखासदार