शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अमर सिंहांच्या 'या' विधानांनी देशाच्या राजकारणात घडवला भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 20:52 IST

प्रदीर्घ आजारामुळे खासदार अमर सिंह यांचं सिंगापूरमध्ये निधन; ६४ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू आहे. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६४ व्या वर्षी अमर सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. सगळ्याच पक्षात उत्तम संबंध असणारे अमर सिंह समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे उजवे हात मानले जायचे. केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएचं सरकार असताना सिंह यांचं नाव कायम चर्चेत असायचं. अनेक वादग्रस्त विधानांमुळे सिंह कायम चर्चेत राहिले. अमिताभ बच्चन, पद्मविभूषण आणि अमर सिंहअमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण देणं म्हणजे दिलीप कुमार यांचा अपमान असल्याचं अमर सिंह म्हणाले होते. एका म्युझिक अल्बमच्या लॉन्चिंगवेळी सिंह यांनी हे विधान केलं होतं. अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत. त्यांचं नाव पनामा पेपर्स प्रकरणातही आलेलं आहे, असं सिंह यांनी म्हटलं होतं.जया बच्चन यांच्याबद्दल वादग्रस्त विधान२०१६ मध्ये गोमांसाचा विषय चर्चेत होता. त्यावेळी जया बच्चन यांनी गोमांस खाल्लं असल्याचं सिंह म्हणाले होते. कोण काय परिधान करतं, काय खातं, यावरून वाद आणि हत्या व्हायला नकोत. एक शिष्टमंडळ ग्लास्गोला गेलं होतं. त्यात जया बच्चनदेखील होत्या. तिकडे सगळ्यांनी गाय आणि डुकराचं मांस खाल्ल होतं. ब्रिटिश लोकांसाठी गाय, डुक्कर म्हणजे पोर्क आणि बीफ असतं, असं सिंह म्हणाले होते.आजम खान यांच्यासोबत विळ्या भोपळ्याचं नातंअमर सिंह आणि आजम खान यांच्यातून विस्तवही जायचा नाही. अमर सिंह यांनी काही वर्षांपूर्वी आजम खान यांच्यावर कडाडून टीका केली होती. आजम खान यांच्याविरोधात ईश-निंदाची केस चालवायला हवी. त्यांना तुरुंगात टाकायला हवं. त्यांना देश का सहन करतो, हे कळत नाही, अशा शब्दांत त्यांनी आजम खान यांना लक्ष्य केलं होतं.यूपीए सरकार वाचवण्यासाठी अमर सिंह यांचा पुढाकारअणर सिंह यांना २००९ मध्ये समाजवादी पक्षातून काढून टाकण्यात आलं. २०११ मध्ये त्यांना 'कॅश फॉर व्होट' प्रकरणात अटक करण्यात आली. यूपीए सरकार वाचवण्यासाठी खासदारांना लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अमेरिकेसोबतच्या अणू करारावरून डाव्यांनी काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा काढला. त्यामुळे लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. त्यावेळी मनमोहन सिंग यांचं सरकार वाचवण्यासाठी अमर सिंह यांनी पुढाकार घेतला होता. 

टॅग्स :Amar Singhअमर सिंहAmitabh Bachchanअमिताभ बच्चनJaya Bachchanजया बच्चनMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादव