- हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक मोदी सरकारची परीक्षा असेल. उपसभापती पी. के. कुरियन ६ जून रोजी निवृत्त होत असून राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपााने हे पद जिंकणे अपेक्षित आहे. मात्र अनेक पक्ष ताकद दाखवत भाजपापासून दूर जात आहेत.एकूण २४५ सदस्यांच्या एक जागा रिक्त आहे. त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सभागृहात भाजपा व मित्रपक्षांकडे ११२ खासदार आहेत. काँग्रेस व मित्रपक्षांकडे ९२ सदस्य असून सात पक्षांच्या ४० सदस्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला तरच त्याचा उमेदवार जिंकूशकतो. तृणमूल (१३), तेलगू देसम (६) व आप (३) यांचा निर्णय झालेला नाही. मात्र ते काँग्रेसला मते देऊ शकतील.बिजद (९), टीआरएस (६), वायएसआर काँग्रेस (२) आणि चौटाला लोकदल (१) यांचे नक्की नाही. भाजपला सध्या विरोधकांना आपलेसे करीत आहे. राज्यसभेचे उपसभापतीपद मित्रपक्षाला वा बिजदला देण्याचे संकेत भाजपने दिलेच आहेत. बिजदला जवळ करण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत.यांची नावे आहेत चर्चेमध्येउपसभापतीपदासाठी नरेश गुजराल (अकाली दल), डॉ. व्ही. के. मैत्रेयन (अण्णाद्रमुक) व आर. सी. पी. सिंह (जनता दल) यांची नावे चर्चेत आहेत. भूपेंद्र यादव यांना भाजपा रिंगणात उतरवू इच्छित आहे.
राज्यसभा उपसभापतीपद : विरोधकांच्या ऐक्याचे भाजपापुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:42 AM