नवी दिल्ली - राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी यूपीएमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. एकीकडे एनडीएकडून उपसभापतीपसाठी जेडीयूचे नेते हरिवंश यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर त्यांच्याविरोधात यूपीएकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांना मैदानात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यसभा उपसभापतीपदासाठी संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता वंदना चव्हाण म्हणाल्या, जर कुणी महिला राज्यसभेची उपसभापती बनणार असेल तर आपल्याला आनंदच होईल. मात्र अद्याप काही निश्चित झालेले नाही. विरोधी पक्षाच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे सध्या फार न बोलता काही काळ वाट पाहणे योग्य ठरेल.
राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक: राष्ट्रवादीच्या मराठमोळ्या नेत्या रिंगणात?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 5:27 PM