शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार; 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 9:22 PM

सोनिया गांधी यांना यंदा लोकसभेऐवजी राज्यसभेवर पाठवले जाणार आहे.

RajyaSabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणूक होणार आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि 6 वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या सोनिया गांधींना यंदा राज्यसभेवर पाठवले जात आहे. त्यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्याचे जवळपास निश्चित झाले असून, त्या 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राजस्थानमधून राज्यसभेवर गेलेले आहेत. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे, त्यामुळे त्यांच्या जागी सोनिया गांधी यांना राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. रिपोर्टनुसार, उद्या म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरतेवेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेदेखील उपस्थित राहतील. 

राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणूकदेशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणुका होणार आहेत. 29 जानेवारी रोजी याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली होती. या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. 56 पैकी 10 जागा काँग्रेसला मिळणार हे निश्चित आहे. यामध्ये राजस्थानची एक जागाही येते. याच जागेवरुन सोनिया गांधी राज्यसभेवर जातील. 

सोनिया गांधी रायबरेलीतून लोकसभा खासदार1999 मध्ये अमेठीमधून लोकसभा निवडणूक जिंकून काँग्रेस अध्यक्ष म्हणून संसदीय राजकारणाला सुरुवात करणाऱ्या सोनिया गांधी 2004 पासून सातत्याने रायबरेलीच्या खासदार आहेत, मात्र यावेळी त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येत आहे. सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवत नसतील तर प्रियंका गांधी वाड्रा यांना रायबरेलीमधून लोकसभेचे तिकीट दिले जाऊ शकते. 

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा