शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण; शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 1:23 PM

वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्णवादग्रस्त कृषी कायद्यांवर अद्यापही तोडगा नाहीशेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

नवी दिल्ली : वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विटही केले आहे. (rakesh tikait says fight against farm laws will continue until solution on 100 days of farmers protest)

०६ मार्च २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने काळे झेंडे दाखवणे आणि केएमपी एक्स्प्रेस वे जाम करण्याचा निर्धार शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाच्या १०० व्या दिवशी सकाळी राकेश टिकैत यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये एक फोटो शेअर करण्यात आला असून, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबाबत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत. 

शेवटपर्यंत संघर्ष करत राहणार

शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस.. तोडगा निघेपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहणार.. लढणार आणि जिंकणार, असे ट्विट शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत देशभरातील विविध राज्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. यावेळी स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या किसान महापंचयातींना संबोधित करून देशभरातून शेतकरी आंदोलनाला अधिकाधिक पाठिंबा मिळावा, यासाठी राकेश टिकैत प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. 

कोरोना लस सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा; निवडणूक आयोगाचे निर्देश

दरम्यान, केंद्रीय कृषी कायदे शेती आणि शेतकरी विरोधी असून, ते मागे घ्यावे, या मागणीवर शेतकरी अद्यापही ठाम आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र, अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांनी सुधारणा सुचवाव्यात, त्यात आवश्यक बदल करू. मात्र, कृषी कायदे मागे घेणार नाही, यावर केंद्र सरकार ठाम असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण