शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Rakesh Tikait : "योगींनी मुझफ्फरनगरमधून स्वबळावर निवडणूक लढवावी"; राकेश टिकैत यांचं थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 2:23 PM

Rakesh Tikait And Yogi Adityanath : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनीही यूपी निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहेत.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष सत्ता मिळविण्यासाठी आता जोरदार प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनीही यूपी निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना मुझफ्फरनगरमधून निवडणूक लढवण्याचे थेट आव्हान दिले आहे. यासोबतच त्यांनी राम मंदिराबाबतही महत्त्वाचं विधान केलं.

न्यूज18 इंडियाच्या एका कार्यक्रमात राम मंदिरावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राकेश टिकैत यांनी दुसरे मंदिर का बांधले पाहिजे. त्या ऐवजी शाळा, रुग्णालये का बांधली जात नाहीत? असं म्हटलं आहे. यासोबत भाजपा आपल्या पक्षाच्या निधीतून मंदिर बांधत आहे का? गावोगावी मंदिरे बांधलेली आहेत असंही म्हटलं आहे. टिकैत यांनी मुख्यमंत्री योगींना रूग्णालये बांधण्याचे काम करण्यास सांगितले. "बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, निरीक्षक भरतीसाठी उमेदवार रस्त्यांवर लाठ्या-काठ्या खात आहेत. त्यांची विवाह मोडली आहेत, त्यांना रोजगार देण्यासाठी सरकारने काम करावे."

"मंदिरं गावातील लोक देणगी जमा करून बांधतात. सर्व धार्मिक स्थळे बांधली जात आहेत. विकास करणे हे सरकारचे काम आहे. मंदिर, मशीद, जिना आणि हिंदू-मुस्लिम हे मुद्दे मत मिळवण्याचे काम करतात" असं म्हटलं आहे. कोणताही राजकीय पक्ष या गोष्टींचा वापर करून त्याद्वारे आपली मतं शोधतो तर, आधीच्या सरकारांमध्ये कैराना आणि मुझफ्फरनगर दंगली झाल्या तेव्हा तुम्ही बोलला नाही का? या प्रश्नावर टिकैत म्हणाले की आम्ही फक्त एवढेच सांगितले होते की मथुरा मुझफ्फरनगर होऊ देऊ नका.

योगी मथुरेतून निवडणूक लढवणार? या प्रश्नावर बोलताना टिकैत हसले आणि म्हणाले की, "त्यांनी मुझफ्फरनगरमधून निवडणूक लढवली तर बरे होईल आणि स्वबळावर लढावे, पक्षाच्या बळावर कशाला लढता." उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुठून निवडणूक लढवणार याची लवकरच घोषणा होऊ शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारण