शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

Rakesh Tikait : "जेसीबीच्या सहाय्याने प्रशासनाने तंबू हटवले तर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये तंबू लावतील" 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 4:20 PM

Rakesh Tikait : दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनात वाद सुरू आहे. या

नवी दिल्ली - गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी प्रशासनाला एक इशारा दिला आहे. "जेसीबीच्या सहाय्याने प्रशासन येथील तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. जर त्यांनी तसं केलं तर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये तंबू लावतील" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. 

दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनात वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राकेश टिकैत यांनी हा इशारा दिला आहे. "जर पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना बळजबरी हटवले तर आम्ही सरकारी कार्यालयांना धान्य बाजार बनवू" असं म्हटलं आहे.  दिल्ली पोलिसांनी गुरूवारी रात्रीपासून गाझीपूर आणि टीकरी सीमेवरील बॅरीकेड्स हटवणं सुरू केलं आहे. ज्या ठिकाणी शेतकरी प्रदीर्घ काळापासून आंदोलन करत आहेत. जवळपास वर्षभरापासून हे मार्ग बंदच आहेत. 

सीमेवर पोलीस आणि शेतकरी यांच्यात तणाव 

राकेश टिकैत यांनी बॅरिकेडसह त्यांचा तंबू उखाडण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्यांनी एकाही शेतकऱ्याचा तंबू हटविला गेला नाही असा दावा केला आहे. दिल्लीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर पोलीस आणि शेतकरी यांच्यात काहीसा तणाव आहे, त्यामुळे दिल्ली पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. शेतकरी आणि पोलीस दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी बसले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठका पण...

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, हरियाण, यूपीच्या विविध सीमांवर शेतकरी संसदेत पारीत झालेल्या तीन कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 10 महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या परंतु अद्याप कुठलाही तोडगा काढण्यात यश आलं नाही. कृषी विधेयकं मागे घ्यावीत अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे. तर विधेयक मागे घेतले जाणार नाहीत अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार विधेयकात बदल करण्याची सरकारची तयारी आहे. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली