लखनऊ,दि.7- वाढत्या टोमॅटोच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. टोमॅटोच्या वाढत्या दराचा अगदी सगळीकडूनच निषेध केला जातो आहे. काँग्रेस पक्षाकडून विविध युक्त्याकरून टोमॅटोच्या वाढलेल्या दराचा निषेध केला जातो आहे. रविवारी लखनऊ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोमॅटो राखी बनवून ती बाजारात विक्रीसाठी ठेवली होती. याद्वारे टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरून सरकारचा निषेध करण्यात आला. याआधी लखनऊ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोमॅटो बँक सुरू केली होती. तसंच विधानसभेच्या बाहरे दहा रूपये किलो दराने टोमॅटो विकले होते. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. काँग्रेसचे राज्य सचिव शैलेंद्र तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली ही टोमॅटो राखीची संकल्पना राबविली गेली. लखनऊच्या कुर्सी रोडवरील गुलाचीन मंदीराच्याबाजूल्या असणाऱ्या दुकांनामध्ये या अनोख्या राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. काँग्रेसकडून बनविण्यात आलेल्या या राख्या विकत घेण्यासाठी लोकांनीही गर्दी केली होती. 'टोमॅटोच्या दरांबद्दल राज्य आणि केंद्र सरकार पूर्णपणे उदासीन आहे. त्याचाच निषेध करण्यासाठी आम्ही ही पद्धत सुरू केल्याचं, शैलेंद्र तिवारी म्हणाले आहेत.
काँग्रेसने सुरू केली 'स्टेट बँक ऑफ टोमॅटो'सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण देण्यासाठी लखनऊ काँग्रेसने 'टोमॅटो बँक' सुरू केली. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत लखनऊ काँग्रेसने शहरात 'स्टेट बँक ऑफ टोमॅटो' ही बँक सुरू केली. एखाद्या बँकेमध्ये जशा सुविधा मिळतात तशाच सुविधा या बँकेतही ग्राहकांसाठी सुविधा होत्या. फक्त या बँकेत कोणतीही गोष्ट टोमॅटोशी निगडीत असावी लागणार. या बँकेत ग्राहकांना टोमॅटोवर फिक्स डीपॉझिट करण्याची सोय देण्यात आली होती. तसंच लॉकर आणि कर्जसुद्धा टोमॅटोवर मिळण्याची सुविधा होती. काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या या बँकेला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळला. बँकेच्या बाहेर लोकांच्या लांब रांगा लावल्या होत्या. घरातून टोमॅटो चोरीला जातील या भीतीने लोक त्यांच्या टोमॅटो बँकेत डिपॉझिट करण्यासाठी येत होते. या रांगेमध्ये एक 103 वर्षांचा वृद्ध व्यक्तीही होता. टोमॅटो बँकेत डिपॉझिट करावे लागण्याची वेळ येऊ शकते असं कधीही वाटलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. मी अर्धा किलो टोमॅटो आता बँकेत डिपॉझिट केले आहेत. बँकेच्या नियमानुसार मला सहा महिन्यांनी एक किलो टोमॅटो मिळणार आहेत, असं त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलं.