नवी दिल्ली - नुकताच मंजूर झालेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि प्रस्तावित एनआरसी कायद्याच्या विरोधात सध्या देशात हिंसाचार उसळला आहे. समाजातील बुद्धिमंतांसोबत सर्वसामान्य जनताही रस्त्यावर उतरली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पसरत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतचे गैरसमज दूर करून या कायद्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी भाजपा २५० ठिकाणी पत्रकार परिषदा आणि प्रत्येक जिल्ह्यात एक सभा घेणार आहे. ३ कोटी कुटुंबांपर्यंत थेट पोहोचण्याचा भाजपाचा उद्देश आहे, अशी माहिती भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी सांगितले. नागरिकत्व कायद्याचे समर्थन करण्यासाठी भाजपाने आखलेल्या कार्यक्रमाबाबत भूपेंद्र यादव म्हणाले की, ''नागरिकत्व कायद्याबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी भाजपा प्रत्येक जिल्हाात एक सभा आजोजित करणार आहे. त्याशिवाय २५० ठिकाणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला जाईल. तसेच आम्ही पुढच्या १० दिवसांत मोहीम राबवून आम्ही ३ कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहोत.''
प्रत्येक जिल्ह्यात सभा, २५० पत्रकार परिषदा घेणार, भाजपा CAAबाबतचे गैरसमज असे दूर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 7:27 PM