उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोव्यात रालोआचे राहिले नाही अस्तित्व

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 06:41 AM2022-01-25T06:41:54+5:302022-01-25T06:42:25+5:30

भाजप उत्तराखंडमध्ये आपल्या मित्र पक्षांवर अवलंबून नाही. गोव्यात खरी निवडणूक ही निकाल जाहीर झाल्यावर सत्तेसाठी होणारी फाटाफूट आणि होणाऱ्या पक्ष त्यागानंतर असल्याचे त्याला चांगले माहीत आहे

Raloa no longer exists in Uttar Pradesh, Uttar Rakhand, Goa | उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोव्यात रालोआचे राहिले नाही अस्तित्व

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोव्यात रालोआचे राहिले नाही अस्तित्व

Next

व्यंकटेश केसर

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) पंजाबमध्ये संयुक्तिक असली, तरी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात ती अप्रासंगिक ठरत आहे. या चारही राज्यांत पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे.पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाचे (संयुक्त) नेते सुखदेव सिंग धिंडसा यांच्यासोबत जागा वाटपाची घोषणा करताना भाजपने ही आघाडी आमच्या नेतृत्वाखाली असल्याचे स्पष्ट केले होते. पंजाबमध्ये भाजप ६५ जागा लढवत आहे, तर पंजाब लोक काँग्रेस ३५ आणि धिंडसा यांचा पक्ष १५ जागा लढवत आहे. पंजाबमध्ये भाजप हा अकाली दलाचा कनिष्ठ भागीदार होता; परंतु आता तो स्वत:ला वरिष्ठ सहकारी असल्याचे दाखवत आहे. राज्यात रालोआने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणलेला नाही.

भाजप उत्तराखंडमध्ये आपल्या मित्र पक्षांवर अवलंबून नाही. गोव्यात खरी निवडणूक ही निकाल जाहीर झाल्यावर सत्तेसाठी होणारी फाटाफूट आणि होणाऱ्या पक्ष त्यागानंतर असल्याचे त्याला चांगले माहीत आहे. उत्तर प्रदेशचा विचार केला तर भाजपने विधानसभा आणि लोकसभा निवडणूक जिंकली ती रालोआच्या प्रयोगामुळे नव्हे, तर धार्मिक ध्रुवीकरण आणि जातींचे जुळवलेले गणित यामुळे.बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) नेते नितीश कुमार यांना आपल्या पक्षाचा विस्तार शेजारच्या उत्तर प्रदेशमध्ये करण्याची इच्छा आहे ती निवडणुकीच्या आधी भाजपशी युती करून. परंतु, चतुर भाजपने उत्तर प्रदेशमध्ये मंडलवादी पक्षाला जागा देणे म्हणजे स्वत:ला दुबळे करून घेणे होय याची जाणीव झाल्यावर त्यांना नकार दिला. 

भाजपने रालोआच्या झेंड्याखाली हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्ली विधानसभा निवडणूक कधीही लढवलेली नाही; परंतु झारखंड, तामिळनाडूत रालोआच्या नावाखाली निवडणूक लढला आहे.

‘आप’ उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न
    मुझफ्फरपूर : मिरणपूर विधानसभा मतदारसंघातील ‘आप’चे उमेदवार जाेगिंदरसिंग उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे निराशेच्या भावनेतून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. 
    त्यांनी राॅकेल ओतून स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पाेलिसांनी त्यांना राेखले. उमेदवारी अर्ज भरताना झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली नाही, असा आराेप सिंग यांनी केला.

Web Title: Raloa no longer exists in Uttar Pradesh, Uttar Rakhand, Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.