PM Modi Speech: श्रीराम जन्मभुमी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अकरा दिवसांचा उपवास धरला आहे. या कालात ते देशभरातील विविध मंदिरांना भेटी देत आहेत. सध्या पीएम दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांनी त्रिशूरमधील गुरुवायूर मंदिरात पूजा केली. यानंतर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले.
बुधवारी (17 जानेवारी) केरळमधील कोची येथील शक्ती केंद्र प्रभारी परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, '22 जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होईल, हा सोहळा लाखो करोडो लोकांसाठी भक्ती आणि विश्वासाने भरलेला क्षण असेल. सोहळा अयोध्येत होतोय, पण देशातील प्रत्येक घरात आणि प्रत्येक मंदिरात श्रीराम ज्योती प्रज्वलीत केली जाईल. या पार्श्वभूमीवर मी तुम्हा सर्वांना आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन करतो.'
पीएम मोदींची विविध मंदिरात पूजा पंतप्रधान मोदींनी केरळच्या गुरुवायूर येथील भगवान कृष्ण मंदिरात पूजा केली. पूजेच्या वेळी त्यांनी केरळचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. त्यापूर्वी मंगळवारी (16 जानेवारी) त्यांनी आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातील लेपाक्षी येथील ऐतिहासिक वीरभद्र मंदिरातही दर्शन घेतले.