नवी दिल्ली: देशभरात आज (5 ऑगस्ट) अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आनंद साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहिले आहे.
अयोध्येत जे राममंदिर तयार होणार आहे त्यापेक्षा सध्याच्या घडीला केवळ दोनच मोठी हिंदू मंदिरे अख्ख्या जगात आहेत. नव्या आराखड्यानुसार तयार होणारे अयोध्येतील राममंदिर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे, भव्य-दिव्य मंदिर असणार आहे. केंद्र सरकारने राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट या नावाने राम मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन केला आहे. मंदिर निर्माणाची जबाबदारी या ट्रस्टवर आहे.
राम मंदिर नेमके कसे असेल?
- 03 मजली असेलवमंदिर. पूर्वीच्या आराखड्यानुसार ते दोन मजली असणार होते.
- 161 फूट असेल उंची. आधीच्या आराखड्यात ती १२८ फूट होती.
05 कळस मंदिराला असतील. पूर्वी ते तीन असणार होते.
हे तुम्हाला माहितेय का?
- जगातले सर्वात मोठे मंदिर कंबोडियामध्ये आहे. ४०१ एकराच्या विस्तीर्ण आवारात ते पसरलेले आहे.
- जगातले दुसऱ्या क्रमांकाचे मोठे मंदिर तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे आहे. तेथील श्री रंगनाथ स्वामी मंदिर १५५ एकरात वसलेले आहे.
3. अयोध्येत तयार होणारे राममंदिर जगातले तिसऱ्या क्रमांकाचे आणि १२० एकर परिसरात वसलेले असेल.