नवी दिल्ली - राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला जवळपास 175 संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. योगगुरू बाबा रामदेवही अयोध्येत दाखल झाले असून हनुमानगढी येथे उपस्थित आहेत.
राम मंदिरासोबतच देशात रामराज्य येणार असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस कायमच सर्वांच्या लक्षात राहील. मला खात्री आहे की, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' स्थापित होईल" असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजले आहे. परिसर सुशोभित करण्यात आला असून जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
असा असणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संपूर्ण कार्यक्रम
- 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून प्रस्थान
- 10.35 वाजता लखनऊ विमानतळावर लॅडिंग
- 10.40 हेलिकॉप्टरने अयोध्येसाठी रवाना होणार
- 11.30 वाजता अयोध्याच्या साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लॅंडिंग
- 11.40 वाजता हनुमानगढी येथे पोहचणार त्यानंतर 10 मिनिटे दर्शन आणि पूजा
- 12 वाजता राज जन्मभूमी परिसरात पोहचणार
- रामलल्लांचे दर्शन आणि पूजा
-12.15 वाजता रामलाला परिसरात पारिजातचे वृक्षारोपण
-12.30 वाजता भूमिपूजन कार्यक्रमाला सुरुवात
-12.40 वाजता राम मंदिर आधारशिलाची स्थापना
- 2.05 वाजता साकेत कॉलेजच्या हेलिपॅडकडे प्रस्थान
- 2.20 वाजता लखनऊमधून हेलिकॉप्टरने प्रस्थान
- लखनऊवरून दिल्लीसाठी रवाना होणार
पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील. त्याआधी ते हनुमानगढीला भेट देणार असून, रामलल्ला विराजमानचेही दर्शन घेणार आहेत. देशात बहुधा प्रथमच एखाद्या पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन होतं असल्याने रामभक्त आणि श्रद्धाळू अत्यंत आनंदात आहेत. अयोध्येत 5 ऑगस्टला दिवाळी असेल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शहरात दीपोत्सव, रांगोळ्या, सर्वत्र सजावट, पूजाअर्चा, आरत्या, शंखनाद, फुलांच्या झळकणाऱ्या माळा यांमुळे प्रत्यक्ष दिवाळी सुरू झाल्याचेच भासत आहे. प्रत्येक जण एकमेकांचे स्वागत जय श्रीरामच्या घोषणेने करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लय भारी! फक्त 30 सेकंदांत आवाजावरून समजणार कोरोना आहे की नाही?, जाणून घ्या कसं
CoronaVirus News : "हर्ड इम्युनिटी' हा कोरोनावरचा यशस्वी उपाय नाही'; नव्या रिसर्चमधून मोठा खुलासा