नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात राम मंदिर भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या राम मंदिराच्या स्वप्नाची पूर्ती होत आहे. या कार्यक्रमाला संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्या आमंत्रितांना आठवण म्हणून एक खास भेट देण्यात येणार आहे.
अयोध्येतील निमंत्रिताना भूमिपूजनाची आठवण म्हणून चांदीच्या नाण्यांची भेट मिळणार आहे. सर्व आमंत्रितांना देण्यात येणारं हे नाणं अत्यंत खास असणार आहे. चांदीच्या नाण्याच्या एका बाजूला प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचं छायाचित्र असेल. तर दुसऱ्या बाजूला राम मंदिर ट्रस्टचं चिन्ह असणार आहे. दहा ग्रॅम वजनाचं हे नाणं असून श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ते तयार केलं आहे. अशी तब्बल 175 चांदीची नाणी तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
चांदीच्या नाण्यांसोबतच कार्यक्रमासाठी येणाऱ्या आमंत्रितांना लाडूचा एक बॉक्सही देण्यात येणार आहे. तसेच तब्बल 1.25 लाख रघुपती लाडू हे आमंत्रित लोकांसोबतच भाविकांनाही वाटले जाणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. योगगुरू बाबा रामदेवही अयोध्येत दाखल झाले असून हनुमानगढी येथे उपस्थित आहेत. राम मंदिरासोबतच देशात रामराज्य येणार असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस कायमच सर्वांच्या लक्षात राहील. मला खात्री आहे की, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' स्थापित होईल" असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजले आहे. परिसर सुशोभित करण्यात आला असून जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Mumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; रस्ते वाहतुकीला फटका
Ram Mandir Bhumi Pujan : "आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार"
CoronaVirus News : लय भारी! फक्त 30 सेकंदांत आवाजावरून समजणार कोरोना आहे की नाही?, जाणून घ्या कसं