हैदराबाद - अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे, असे ओवेसींनी म्हटले आहे.पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत हा एक सेक्युलर देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे.
Ram Mandir Bhumipujan :"हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 5:06 PM
पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आपला संताप व्यक्त केला.
ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवसअयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनासाठी काँग्रेसही तितकीच जबाबदार