शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

पंतप्रधान मोदी 11.15ला पोहोचणार अयोध्येत, व्यासपीठावर भागवतांसह असणार फक्त 5 लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 9:20 PM

हे सर्व निर्णय अयोध्येतील मानस मंदिरात शुक्रवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत सर्व व्यवस्थांवर अखेरचे शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय, मुख्य सचिव, गृह सचिव आणि डीजीपी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आणि मंदिर कार्यक्रमाच्या व्यवस्थेची पाहणीही केली. 

ठळक मुद्देया भूमिपूजन कार्यक्रमसाठी 200 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.मोदींना भेट दिली जाणार कोदंडधारी प्रभू रामचंद्रांची मूर्ती3 ऑगस्टपासूनच अयोध्येत उत्सवाला सुरुवात होणार आहे.

नवी दिल्ली - अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयार जोरात सुरू आहे. कार्यक्रमापूर्वी अयोध्येला सजवण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 11 वाजून 15 मिनिटांनी अयोध्येत पोहोचतील. ते दोन तासांहून अधिक वेळ येथे राहणार आहेत. यानंतर ते दुपारी 2 वाजता अयोध्येतून परततील.

अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी सर्वप्रथम हनुमानगढी येथे जाऊन तेथे दर्शन घेतील. यानंतर ते रामललाचे दर्शन करतील आणि यानंतर भूमिपूजनचा कार्यक्रम होईल. अयोध्येत व्यावपीठाची व्यवस्थाही निश्चित करण्यात आली आहे. या व्यासपीठावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हेच उपस्थित राहतील. 

हे सर्व निर्णय अयोध्येतील मानस मंदिरात शुक्रवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत सर्व व्यवस्थांवर अखेरचे शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय, मुख्य सचिव, गृह सचिव आणि डीजीपी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आणि मंदिर कार्यक्रमाच्या व्यवस्थेची पाहणीही केली. 

या भूमिपूजन कार्यक्रमसाठी 200 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यांची यादी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवली आहे. कोरोनामुळे काही मोजक्या लोकांनाच या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

मोदींना भेट दिली जाणार कोदंडधारी प्रभू रामचंद्रांची मूर्ती -यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाकडाची दुर्मिळ दीड फूटाची कोदंडधारी रामचंद्रांची तसेच लव आणि कुश यांची एक फुटाची मूर्ती भेट म्हणून दिली जाणार आहे. भगवान श्रीरामांच्या धनुष्याला कोदंड म्हणून ओळखले जाते. जेव्हा ते माता सीतेच्या शोधात दक्षिण भारतात पोहोचले तेव्हा त्यांच्याजवळ कोदंड धनुष्य होता.

3 ऑगस्टपासूनच उत्सवाला सुरुवात -राम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. मात्र, 3 ऑगस्टपासूनच अयोध्येत उत्सवाला सुरुवात होणार आहे. प्रशासनाकडून शहरात लाखो दिवे लावण्यात येणार आहेत. याशिवाय अयोध्येतील नागरिकांनाही घराबाहेर दिवे लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ