शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
2
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
3
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
4
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
5
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
6
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
7
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
8
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
9
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
10
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
11
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
12
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
13
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
15
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
16
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
17
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
19
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
20
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 

अयोध्येतील राम मंदिर टार्गेटवर, देशातील ATM सेंटर्स उडवण्याचा जैश ए मोहंमदचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 6:51 AM

प्रजासत्ताक दिनाच्या दरम्यान देशात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याची जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेने जय्यत तयारी केली

आशिष सिंहमुंबई :

प्रजासत्ताक दिनाच्या दरम्यान देशात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याची जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेने जय्यत तयारी केली असून, त्यात अयोध्येतील राम मंदिरही लक्ष्य करण्याचा कटही समाविष्ट असल्याची खळबळजनक माहिती गुप्तचर विभागाच्या हाती आली आहे. या संदर्भातील अहवालाची कागदपत्रेच ‘लोकमत’च्या हाती आली आहेत. या पार्श्वभूमीवर सगळ्या यंत्रणांसह सज्ज राहण्याच्या सूचना गुप्तचर विभागाने दिल्या आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार जैश ए मोहंमदचे दहशतवादी नेपाळमार्गे उत्तर प्रदेशात दाखल होऊन राम मंदिरावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. हा कट अयशस्वी झाला तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, राजस्थानमधील कोणत्याही  इतर मोठ्या राम मंदिरावर हल्ले करून जातीय तणाव निर्माण करण्याच्या सूचनाही या संघटनेच्या दहशतवाद्यांना देण्यात आल्या आहेत. 

एटीएमही लक्ष्यबहुसंख्य एटीएमवर सुरक्षा नसल्याने या ठिकाणी गॅसोलीनचा वापर करीत स्फोट घडवून आणावेत. रोख रक्कम जळून खाक होईल. असे लहान स्फोट घडवल्याने येथील आर्थिक व्यवस्था खिळखिळी होईल, अशाही सूचना  दहशतवाद्यांना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा व्यवस्थेत वाढ गुप्तचर विभागाने पुरविलेल्या या माहितीनंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रम वगळता प्रार्थनास्थळांबाहेरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली असून, कोणतीही आपत्कालीन स्थिती हाताळण्याच्या दृष्टीने काही ठिकाणी मॉक ड्रीलही घेण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ पाेलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.संदेश वहनासाठी प्राेग्रॅमिंग आणि कोडिंग शिकण्याच्या सूचना- गेल्या काही दिवसात काही खासगी इन्क्रिप्टेड रॉकेट चॅट पकडले असता ते तपासल्यावर ही धक्कादायक माहिती गुप्तचर विभागाच्या हाती आली आहे. त्या चॅटमध्ये दहशतवाद्यांनी प्राेग्रॅमिंग आणि कोडिंगची पद्धती शिकून घ्यावी. आपल्या लढाईत संदेश वहनाचे हे एकमात्र साधन असेल असेही त्या चॅटमध्ये नमूद करण्यात आले आहे. - २०२२ साली देशात याच पद्धतीने तब्बल ९४ दंगली घडवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता २०२३ मध्येही मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली घडविण्याची ‘जैश ए मोहंमद’ची योजना आहे.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला