शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

Ram Mandir Inauguration: ७०० किमी पायी प्रवास! जयपूरहून चालत भाजपा आमदार अयोध्येत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 8:58 PM

२२ जानेवारी २०२४ हा दिवस तमाम भारतावासियांसाठी खास आहे.

नवी दिल्ली: २२ जानेवारी २०२४ हा दिवस तमाम भारतावासियांसाठी खास आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत २२ जानेवारीला रामललाच्या भव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला भव्य राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आता भाजपा नेते बाबा बालकनाथ यांनी राम मंदिराबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा आमदार बाबा कमलनाथ हे जयपूरहून चालत अयोध्येला पोहचले आहेत. त्यांनी सांगितले की, संपूर्ण देश भक्तीमय आहे, संपूर्ण देश राममय झाला आहे. मी राजस्थानमधील जयपूरहून अयोध्येला पायी चालत आलो आहे. आज अयोध्येत रामभक्तांचा मेळा दिसत आहे. अगदी हेच सर्व ठिकाणी, मंदिरात, गावात, शहरात आणि संपूर्ण भारतात दिसते आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. खरं तर जयपूर ते अयोध्या हे ७०० किलोमीटरचे अंतर पायी चालत बालकनाथ यांनी रामललाच्या भव्य मंदिरात प्रवेश केला. 

७०० किमी पायी प्रवासतब्बल ५०० वर्षांनंतर रामलला अयोध्येत भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच संपूर्ण अयोध्या शहराला आकर्षक रोषणाई करून सजवण्यात आले आहे. कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून, तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

कोण आहेत बाबा बालकनाथ?बाबा बालकनाथ यांचा जन्म १६ एप्रिल १९८४ रोजी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील कोहराना गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. बालकनाथ हे अलवरचे खासदार राहिले आहेत. भाजपाने त्यांना तिजारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपच्या फायरब्रँड नेत्यांपैकी एक असलेले बाबा बालकनाथ योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कपडे घालतात. त्यामुळे लोक त्यांना राजस्थानचे योगी म्हणतात. बाबा बालकनाथ यांची अलवर आणि आसपासच्या परिसरात मजबूत पकड आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतही भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी विजय संपादन केला. ते भाजपाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला फिट बसतात. निवडणुकीपूर्वी भाजपाने राजस्थानमध्ये आपल्या युनिटची घोषणा केली, तेव्हा त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरRajasthanराजस्थानAyodhyaअयोध्याBJPभाजपाMLAआमदार