"नरेंद्र मोदींनी खरंच उपवास धरला होता? मला संशय…’’ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने घेतली शंका   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 07:48 PM2024-01-23T19:48:10+5:302024-01-23T19:49:00+5:30

Narendra Modi: राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवस कठीण अनुष्ठान करून उपवास केला होता. या काळात मोदींनी केवळ नारळ पाण्याचं सेवन केलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या उपवासावर आता काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी शंका घेतली आहे.

Ram Mandir: Narendra Modi really fasted? I doubt...'' the senior Congress leader veerappa moily doubted | "नरेंद्र मोदींनी खरंच उपवास धरला होता? मला संशय…’’ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने घेतली शंका   

"नरेंद्र मोदींनी खरंच उपवास धरला होता? मला संशय…’’ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने घेतली शंका   

अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी उत्साहात साजरा झाला होता. या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवस कठीण अनुष्ठान करून उपवास केला होता. मोदींनी १२ ते १२ जानेवारीपर्यंत हा उपवास धरला होता. या काळात मोदींनी केवळ नारळ पाण्याचं सेवन केलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या उपवासावर आता काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी शंका घेतली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या उपवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरोखरच उपवास धरला होता की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. जर कुठल्याही त्यांनी गर्भगृहामध्ये प्रवेश केला असेल तर ते स्थान अपवित्र होऊ शकतं. तसेच त्या ठिकाणी शक्ती उत्पन्न होऊ शकणार नाही.

मोईली पुढे म्हणाले की, एका डॉक्टरसोबत मी मॉर्निंग वॉकला गेलो असताना त्यांनी सांगितले की, एक व्यक्ती एवढे दिवस काहीही न खाता पिता जिवंत राहू शकणार नाही. जर अशी व्यक्ती जीवंत राहिली तर तो एक चमत्कार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी ११ दिवसांचं व्रत करणार असल्याची माहिती दिली होती. यादरम्यान, मोदींनी कठोर नियमांचं पालन केलं.  जप आणि गोपूजन केलं. ते जमिनीवर झोपले, तसेत आहारामध्ये नारळाचं पाणी प्यायले. तसेच मोदींनी रामायणासंबंधीत असा ४ राज्यांमधील ७ मंदिरांमध्ये पूजा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ दिवसांच्या व्रत काळात स्वच्छ तीर्थ अभियानासाठी पुढाकार घेतला होता. १२ जानेवारी रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये मोदींनी स्वत: सफाई केली. त्यानंतर देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छतेची मोहीम सुरू झाली होती.  

Web Title: Ram Mandir: Narendra Modi really fasted? I doubt...'' the senior Congress leader veerappa moily doubted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.