Ram Mandir PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाची प्राणप्रिष्ठापना झाली. यानंतर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आध्यात्मिक वचनबद्धतेबद्दल आणि उपवासाच्या कठोर नियमांचे पालन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
पीएम मोदींनी केला 11 दिवसांचा उपवासस्वामी गोविंद देव गिरीजी महाराज म्हणाले की, मी इतर महापुरुषांशी सल्लामसलत करुन तुम्हाला म्हणालो होतो की, तुम्हाला फक्त 3 दिवस उपवास करायचा आहे. पण, तुम्ही तर 11 दिवसांचांचा उपवास केला. मी थोडा तर्कसंगत आहे. पूर्वी तुमच्या परम पूज्य आईला भेटल्यानंतर पुष्टी केली होती. तेव्हा मला समजले की, अशाप्रकारचा उपवास तुम्ही 40 वर्षांपासून करत आहात.
पीएम मोदींनी परदेश दौरे पुढे ढकललेदेव गिरीजी महाराज म्हणाले की, असा राष्ट्रीय नेता मिळणे ही सामान्य गोष्ट नाही. परदेश दौरे करू नका, असे आम्ही तुम्हाला सांगितले होते. तुम्ही तुमचे परदेश दौरे पुढे ढकलले, हे केवळ देशप्रेमामुळेच आहे. तुम्ही आपल्या दिव्य देशाचा प्रवास केला. तुम्ही नाशिकपासून सुरुवात केली अन् गुरुवायूर आणि श्री रामेश्वरमलाही गेला.
11 दिवस जमिनीवर झोपलेतुम्ही भारत मातेच्या कानाकोपऱ्याला भेट देऊन दैवी आत्म्यांना अयोध्येत येण्याचे आमंत्रण देत होता. तुम्ही अशा थंडीच्या काळात 11 दिवस जमिनीवर झोपलात, जणू भगवान ब्रह्मदेवच तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. लोकांना माहित नसेल, पण 3 दिवस तुम्ही मंदिरातही राहिलात. आमचे भाग्य आहे की आम्हाला तुमच्यासारखे पंतप्रधान मिळाले, अशाप्रकारे गोविंद देव गिरी महाराज यांनी पीएम मोदींचे कौतुक केले.