Ram Navami : आज श्रीराम नवमी, म्हणजेच प्रभू रामाची जयंती आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. खासकरुन श्रीराम जन्मभूमी अयोध्येत तर दिवाळीसारखे वातावरण पाहायला मिळत आहे. शरयूचा किनारा लाखो दिव्यांनी उजळून निघाला आहे. अयोध्येत आज सकाळपासून राम जन्मोत्सव साजरा होत आहे. सकाळी साडेनऊ वाजता प्रभू रामललाचा विशेष अभिषेक झाला, त्यानंतर दुपारी 12 वाजता भगवान रामाचा सूर्य टिळक झाला.
जगभरातील भाविकांनी रामललाच्या सूर्य टिळकाचे अनोखे दृष्य पाहिले. त्यानंतर रामनवमीच्या निमित्ताने अयोध्येतील सरयू घाटावर संध्याकाळची आरती करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाविकांनी लाखो दिवे लावल्यामुळे शरयुचा किनारा उजळून निघाला. रामोत्सव म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाविकांसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. यावेळी उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला, रांगोळी आदींचे आयोजन केले.
चौधरी चरणसिंग घाटावर कार्यक्रमाचे आयोजनया कार्यक्रमासाठी सायंकाळपासून शेकडो स्वयंसेवक सरयूच्या काठावरील चौधरी चरणसिंग घाटावर पोहोचू लागले. संध्याकाळ जवळ येताच लोकांनी लखो अधिक दिवे लावून शरयूचा किनारा उजळवला. यामध्ये अनेक शाळांमधील मुलांचाही समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन अयोध्येचे आमदार वेदप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह वैदिक मंत्रांच्या पठणाने करण्यात आले.