सिरसा : दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणाºया बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी १0 वर्षे याप्रमाणे एकूण २0 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे ३0 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी १४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.दोन्ही गुन्ह्यांसाठी प्रत्येकी १0 वर्षे शिक्षा झाली असल्याने, बाबाला तब्बल २0 वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. शिक्षा सुनावल्यावर त्याला तुरुंगात पाठविण्यात आले, तेव्हा त्याचे भरजरी कपडे काढून तुरुंगातील वेश घालण्यासाठी दिला गेला.सीबीआय न्यायालयाचे न्या. जगदीप सिंह यांना विशेष हेलिकॉप्टरने दुपारी रोहतक येथे आणण्यात आले. तेथून ते तेथील सुनरिया तुरुंगात गेले आणि त्यांनी बाबाला शिक्षा सुनावली. ती सुनावताच, बाबा राम रहीम धाय मोकलून रडू लागला आणि माफीची मागणी करू लागला. ‘माझ्यावर दया दाखवा, मी समाजसेवक आहे,’ असे तो हात जोडून सांगत होता. त्याच्या वकिलांनीही त्याची सजा कमी करावी, अशी मागणी केली, पण शिक्षेत बदल झाला नाही.बाबा राम रहीमने २00२ साली आपल्या सिरसा आश्रमातील गुहेमध्ये दोन साध्वींवर बलात्कार केले होते. त्याची तक्रार एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी पाठविले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी बाबाने, तसेच काही राजकारण्यांनी अधिकाºयांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता, पण अधिकाºयांनी दबाव झुकारून तपास पूर्ण केला आणि बाबावर खटले दाखल झाले. न्या. जगदीप सिंह यांनीही अत्यंत निडरपणे निकाल दिला.प्रचंड बंदोबस्तबाबाची शिक्षा आज जाहीर होणार असल्यामुळे पंजाब, हरयाणा व दिल्लीत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला होता. रोहतकमध्ये पोलीस आणि निमलष्करी दलाच्या २३ तुकड्या, तसेच लष्कराच्या काही तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. सुनारिया तुरुंगाच्या परिसरात प्रचंड बंदोबस्त होता. रोहतकमध्ये येणाºया प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत होती. तिथे कलम १४४ लागू होते. हरयाणातील शिक्षणसंस्था आजही बंद होत्या. हरयाणा व पंजाबमध्ये मंगळवारी सकाळपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यूसोनिपत जिल्ह्यात आश्रमात घातलेल्या झडतीत काठ्या व इतर वस्तू सापडल्या. पेट्रोल, डिझेल आणि हत्यारे आदी वस्तू लपवून ठेवल्याच्या संशयानंतर, पोलिसांनी ही मोहीम राबविली. सिरसाजवळील ग्रामस्थांनी डेरासमर्थकांशी दोन हात करण्यासाठी, दगड, विटा, काठ्या यांची जमवाजमव करून ठेवली होती. शाहपूर बेगुतील लोकांनी सांगितले की, सुरक्षेसाठी आम्ही सज्ज आहोत. राज्यात आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.बाबावर खुनाचेही आरोपराम रहीमवर खुनाचेही आरोप आहेत. बाबाची कुलंगडी तेथील एका सायंदैनिकाने उघडकीस आणली होती. त्यानंतर, त्यात काम करणाºया एका पत्रकाराची हत्या करण्यात आली होती. ती बाबाच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप आहे.तुरुंगात जाण्यासाठी बाबा तयार होईनात, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना ओढत कोर्टाबाहेर काढले, तेव्हा ते ‘कोई तो मुझे बचाओ’ असे रडून ओरडत होते.बाबाने आजारपणाचा कांगावा केला. मला काही झाले, तर त्याची जबाबदारी सरकारवर असेल, अशीही त्यांनी धमकी दिली.मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा यांनी तपासून बाबा ठणठणीत असल्याचा निर्वाळा दिल्यावर, त्यांची रवानगी तुरुंगात झाली.न्यायालयाने खासगी कपडे वापरण्यास मनाई केल्याने, बाबांचा झगमगीत पोशाख उतरवून, त्यांना कैद्याचा चौकडीचा वेश देण्यात आला.सीबीआय कोर्टाने सुनावली शिक्षामाफीसाठीहात जोडले,पण शिक्षा कमी झाली नाही.समाजसेवक असल्याचे सांगून केली शिक्षा कमी करण्याची विनंती; कोर्ट म्हणाले, गुन्हा गंभीर आहेशिक्षा ऐकताच फरशीवर बसून रडू लागलाराम रहीम.राम रहीमवर आणखी२ खटलेबलात्काराची बातमी प्रसिद्ध करणाºया पत्रकाराचा खून केल्याप्रकरणाची सुनावणी सप्टेंबरमध्ये होणार आहे.डेरा मुख्यालयात ४५६ शिष्यांना नपुंसक केल्याप्रकरणी आॅक्टोबरमध्ये निकाल आहे.
बलात्कारी राम रहीमला २० वर्षांचा कारावास!, पीडित साध्वींना मिळणार भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 6:09 AM