रोहतक : आश्रमातील मुलींवर अत्याचार करणाऱ्या डेरा सच्चा सौदाचाबाबा राम रहीम याला गेल्या वर्षीच 25 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्या अनुयायांनी हरयाणामध्ये मोठा आकांडतांडव केला होता. या घटनेला आज वर्ष पूर्ण झाले असून सुनारिया तुरुंगात बाब शिक्षा भोगत आहे. या वर्षभरात राम रहीम याचे वजन कमी झाले असून चेहऱ्यावरचे तेजही फिके पडले आहे. तर दाढी पांढरी झाली आहे. वजन कमी होण्याचे कारण बाबालाच माहिती, असे जेलच्या अधिकाऱ्यांनी मिश्किलपणे सांगितले. चला जाणून घेऊया या बाबाची जेलमधील अवस्था.
राम रहीमचे तुरुंगात जातानाचे वजन 105 किलो होते. ते आता 92 किलो झाले आहे. बाबा दिवसाची सुरुवात पहाटे 5 वाजता होते. योग आणि चालण्याचा व्यायाम सकाळी करतो. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत बाबाचा सामान्य कैद्यांप्रमाणेच वावर असतो. त्याची तुरुंगातील खोली अर्ध्या एकरात आहे. चारही बाजुना 8 फुटांची भिंत घातलेली आहे. त्याची कोठडी 15 फूट लांब आणि 10 फूट रुंद आहे. राम रहीमला दिवसाला 20 रुपयांची मजुरी दिली जाते. बरॅकच्या बाहेर त्याने भाज्या लावल्या आहेत. या भाज्या जेलमधील मेसमध्ये पाठविले जाते. सकाळी 6 वाजता त्याला तेथे कामासाठी सोडले जाते. सकाळी 8 वाजता नाष्टा, नंतर त्याच्यावरील कोणत्या ना कोणत्या खटल्यावर सुनावणी असेल तर व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी पाठविले जाते. यात त्याचा अर्धा दिवस संपतो. रिकाम्या वेळामध्ये राम रहीम पुस्तके वाचतो. त्याला सध्या मुंशी प्रेमचंद यांच्या गोष्टी आवडू लागल्या आहेत. तो जेलमधील सहकाऱ्यांसोबत बॅडमिंटनही खेळतो.
1 टन ग्रिटींग कार्डतुरुंग प्रशासनाला येणाऱ्या टपालामध्ये राम रहीमसाठी आलेली 90 टक्के पत्रे असतात. 12 ऑगस्टला त्याच्या जन्मदिवशी तर अनुयायांनी 1 टन ग्रिटींग कार्ड पाठवली होती. हरियाणा, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांतून ही पत्रे आलेली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेली पत्रे पाहून टपाल कर्मचारीही अचंबित झाले आहेत. या टपालात साध्या कागदावर लिहिलेल्या मजकुरासह महागडी ग्रिटींग आहेत. अन्य कैद्यांना कोठडीत डांबले जातेराम रहीमला बाहेर काढायचे असल्यास किंवा त्याला जेलच्या कॅन्टीनमधून काही सामान घ्यायचे असल्यास अन्य कैद्यांना त्यांच्या कोठडीमध्ये डांबले जाते. राम रहीमला कँटीन कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही पाहू शकत नाही. बाबाने त्याला भेटायला येणाऱ्यांच्या यादीमध्ये आई, पत्नी, सून, मुली, मुलगा, जावई आणि हनीप्रीत यांचे नाव लिहीले आहे.
पीसीओची सुविधा मागितलीराम रहीमने आपल्या आईसोबत रोज बोलायला मिऴावे यासाठी पीसीओ सुविधा मागितली आहे. मात्र, त्याला ती मिळालेली नाही. पीसीओ म्हणजे पाच मिनिटांसाठी फोनवर बोलणे. ही सुविधा प्रत्येक कैद्याला मिळते.